natural fertilizer impact agrowon
Video

Organic Fertilizer: सेंद्रिय खते वापराच्या योग्य पद्धती कोणत्या?

organic fertilizer benefits: शेतीची उत्पादकता व जमिनीची सुपीकता कायम राखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक आहे. अनेकदा पीक काढणी झाल्यानंतर शेतात अवशेष शिल्लक राहतात. बहुतांश शेतकरी हे अवशेष जाळून टाकतात, परंतु त्यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते. याऐवजी हे अवशेष जमिनीत गाडल्यास किंवा आच्छादन म्हणून वापरल्यास अनेक फायदे होतात. यातून मातीची सुपीकता वाढते, अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो आणि जमिनीचा पोत सुधारतो.

Team Agrowon

how to use organic fertilizers: सेंद्रिय खत वापरण्याच्या पद्धती:

भर खते (शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत) पेरणीच्या १० ते १५ दिवस आधी जमिनीत मिसळावीत.

जोरखते (पेंडी, प्राणी अवशेष खत) पेरणीवेळी किंवा दोन ओळींमधून जमिनीत मिसळावीत.

अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार योग्य खतमात्रा पिकाच्या गरजेनुसार द्यावी.

सेंद्रिय खताचे फायदे:

सेंद्रिय खतांमुळे अन्नद्रव्ये पोषणाबरोबरच मातीचे कण एकमेकांस चिकटून राहतात.

जमिनीचा पोत सुधारतो.

पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

सच्छिद्रता वाढून हवा खेळती राहते.

जमिनीची धूप कमी होते.

सामू नियंत्रित राहतो.

सजीव जिवाणूंसाठी पोषक वातावरण तयार होते.

जमिनीचे तापमान नियंत्रित राहते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Logistics Hub: सोलापूर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनणार

Urea Black Market: अनुदानित ५८ टन युरियाची काळ्या बाजारात विक्री

Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळ दूध दरात २ रुपयांची वाढ

Shaktipeeth Highway Project: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनात ‘एनए’चे रॅकेट ?

Car Cargo Project Issue: ‘कार कार्गो’ प्रकल्प कागदावरच

SCROLL FOR NEXT