Gram price drop agrowon
Video

Papaya market: बाजारात पपईला चांगली मागणी, तर हरभरा-सोयाबीनचे दर घसरले

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हळद, पपई, हरभरा, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

देशातील बाजारात हळदीची आवक वाढत असून, महाराष्ट्र आणि तेलंगणात विशेषतः चांगली आवक दिसून येत आहे. तेलंगणाचा हंगाम शिगेला पोचल्याने हळदीचे दर दबावात आले आहेत. तेलंगणात हळद १० हजारांच्या खाली गेली असून, महाराष्ट्रात १० ते ११ हजारांच्या दरम्यान आहे. राज्यात हळदीची आवक आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दरावर दबाव राहू शकतो. हरभरा बाजारही दबावात असून, देशात वाढती आवक आणि आयात धोरणातील अनिश्चिततेमुळे दर कमी आहेत. सध्या हरभरा ५१०० ते ५५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील दीड-दोन महिन्यांत आवक वाढेल आणि दरांवर परिणाम होऊ शकतो. राज्यात पपईला चांगली मागणी असून, रमजान आणि वाढत्या तापमानामुळे १७०० ते २००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर स्थिर असून, देशात सोयाबीनला ३८०० ते ४१०० रुपयांदरम्यान दर मिळत आहे. कापसाच्या दरातही चढ-उतार दिसून येत असून, देशातील बाजारात विक्री ६८०० ते ७००० रुपयांच्या दरम्यान झाली आहे. मार्चनंतर कापसाची आवक कमी होईल, त्यामुळे दर वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT