Onion market June 2025 agrowon
Video

Onion Rate: कांदा दरात वाढ; मात्र शेतकरी दुहेरी संकटात

Monsoon effect on onion: गेल्या आठवड्याभरात कांद्याच्या दरात थोडी सुधारणा दिसून आली आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पावसामुळे दुहेरी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Team Agrowon

Onion crop update: गेल्या आठवड्याभरात कांद्याच्या दरात थोडी सुधारणा दिसून आली आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पावसामुळे दुहेरी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची गुणवत्ता देखील घटली आहे. पावसाचे आणि तापमानातील चढ-उतारांचे संकट अजूनही कायम असल्याने जून महिन्यात कांद्याची बाजारात आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दराला काहीसा आधार मिळू शकतो. गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारात कांद्याची आवक पावसामुळे काहीशी कमी झाली आहे. त्यातही गुणवत्तेचा कांदा कमी प्रमाणात येत असल्यामुळे त्याचे दर वाढले आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, पावसामुळे भिजलेला व खराब कांदा ३०० ते १२०० रुपये दरम्यान विकला जातो, तर चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचे दर १४०० ते १८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management: ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ची सुरुवात

Ahilyanagar Heatwave: अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

Rajura Farmer Issues: राजुरा येथे पाच शेतकऱ्यांनी घेतले विष

Women Empowerment: बचत गटांच्या महिलांची उल्लेखनीय कामगिरी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा ४५ कोटींचा विमा मंजूर

SCROLL FOR NEXT