cotton market price agrowon
Video

Cotton Rate: शेतकऱ्यांना हमीभाव, उद्योगांना योग्य दरात कापूस भावांतरमुळे मिळेल

Cotton MSP: सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात वाढ जाहीर केली आहे. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आणि देशांतर्गत मागणीत घट यामुळे कापसाचे बाजारभाव दबावात आले आहेत. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा भारतातील दर अधिक असल्याने भारतीय कापूस जागतिक बाजारात स्पर्धेत टिकू शकलेला नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने भावांतर योजना राबवावी, अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना हमीभाव मिळू शकेल आणि उद्योगांना बाजारभावाने कापूस उपलब्ध होऊ शकेल, असा त्यांचा प्रस्ताव आहे.

Team Agrowon

Bhavantar scheme cotton: एकीकडे सरकार हमीभाव वाढवत असताना, बाजारात मात्र कापसाचे दर सतत घसरलेले दिसत आहेत. मागील संपूर्ण हंगामात कापूस हमीभावाच्या खालीच विकला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर कमी राहिले. विशेष म्हणजे भारतातील दर हे हमीभावाखाली असूनही आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरांपेक्षा अधिक राहिले. सध्याही देशात कापूस आयातीवर ११% आयात शुल्क असूनही काही प्रमाणात आयात होत आहे, असे आयातदारांचे म्हणणे आहे. या सर्व तफावतीमुळे सरकारच्या सीसीआयला यंदा विक्रमी १०० लाख गाठी कापूस खरेदी करावा लागला. मात्र, जे शेतकरी सीसीआयला कापूस विकू शकले नाहीत, त्यांचे मोठे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Fire: शामगावात १०८ गुंठ्यांतील ऊस आगीमध्ये जळून खाक

Rural Water Supply Plan: गावे, वाड्या-वस्त्यांना उन्हाळा होणार सुसह्य

India Export: जागतिक व्यापार संघटनेमुळे निर्यातीला चालना

Potato Farming Losses: खर्च ५८ हजार अन् उत्पन्न अवघे २७ हजार

River Conservation: नदीचे आक्रंदन जाणणाऱ्या शैलजा

SCROLL FOR NEXT