tur dal imports agrowon
Video

Tur Rate: आवक कमी असूनही हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी भाव

tur dal imports: सरकारने यंदा हमीभावाने विक्रमी प्रमाणात तूर खरेदी केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात बाजारात तुरीचे दर मात्र घसरलेले आहेत. उघड आयात धोरणामुळे स्वस्त दरातील आयात आणि सरकारी खरेदीचा संभाव्य साठा यामुळे देशांतर्गत बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. सध्या तुरीचे बाजारभाव हमीभावाच्या तुलनेत किमान १२ ते १५ टक्क्यांनी कमी आहेत, आणि याचा थेट फटका देशातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे.

Team Agrowon

pulses import impact: मागील हंगामात तुरीचे दर वधारल्याने केंद्र सरकारने आयात खुले केली. यामुळे म्यानमार आणि आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर तूर आयात सुरू झाली. यंदा या देशांतही चांगले उत्पादन झाले असून भारताने तुरीच्या आयातीसाठी कोणतेही शुल्क किंवा अटी न ठेवता ३१ मार्च २०२६ पर्यंत आयात खुली ठेवली आहे. परिणामी, गेल्या वर्षभरात तुरीची तब्बल १२ लाख ६४ हजार टन आयात झाली असून, ही आयात आतापर्यंतची सर्वाधिक असल्याचे आयातदारांचे म्हणणे आहे. केंद्राने यंदा १२ लाख टन तूर हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते, त्यापैकी सुमारे ६ लाख टन खरेदी पूर्ण झाली आहे. यापूर्वी केवळ २०१७-१८ या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. मागील दोन वर्षांत मात्र बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असल्यामुळे सरकारी खरेदी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. यंदा मात्र भाव हमीभावाखाली गेल्याने खरेदी शक्य झाली. पण या साठवलेल्या तुरीचा साठा सरकार भविष्यात बाजारात आणेल, या शक्यतेमुळे बाजारावर भाव घसरणीचा दबाव निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT