Fertiliser Supply: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत १९ जूननंतर सुमारे २ लाख ९० हजार ८५६ टन रासायनिक खतसाठा उपलब्ध होता. अलीकडे पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता असून, त्यासोबतच खतांच्या मागणीतही वाढ अपेक्षित आहे..उपलब्ध खतसाठ्यामध्ये ६१ हजार ९५ टन युरिया, २१ हजार ४१९ टन डीएपी, ११ हजार ९२ टन एमओपी, १ लाख ४८ हजार ४९५ टन एनपीके आणि ४८ हजार ७५५ टन एसएसपी खताचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली..Fertilizer Stock Available: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७२ हजार टन खतसाठा उपलब्ध .७.५१ लाख टन खतसाठा मंजूरछत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके आणि एसएसपी मिळून एकूण ९ लाख ६४ हजार १६० टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी कृषी आयुक्तालयाने ७ लाख ५१ हजार ४०० टन खतासाठा मंजूर केले आहे..Kharif Fertilizer Stock: खरिपासाठी ४ हजार ४४४ टन खतसाठा सिंधुदुर्गात उपलब्ध.२.२७ लाख टन खताचा पुरवठामंजूरसाठ्यापैकी जूनअखेरपर्यंत ३ लाख २९ हजार ९०४ टन खत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १ लाख १२ हजार ९३० टन युरिया, ३७ हजार २६ टन डीएपी, १ लाख ३९ हजार १८८ टन एनपीके आणि ३५ हजार टन एसएसपी खताचा समावेश आहे. यापैकी १९ जूनपर्यंत २ लाख २७ हजार ३२३ टन खताचा प्रत्यक्ष पुरवठा झाला. त्यात ८६ हजार ७४ टन युरिया, ११ हजार २६१ टन डीएपी, ७ हजार ९९३ टन एमओपी, ९२ हजार ४५६ टन एनपीके आणि २९ हजार ५३९ टन एसएसपी खताचा समावेश आहे..३.२२ लाख टन खतांची विक्रीपुरवठा झालेल्या २ लाख २७ हजार ३२३ टन खतासोबतच एप्रिल २०२६ अखेर मागील हंगामातील ३ लाख ८५ हजार ५५१ टन खतसाठा शिल्लक होता. त्यामुळे खरीप हंगामासाठी एकूण ६ लाख १२ हजार ८७४ टन खत उपलब्ध झाले होते. त्यापैकी १९ जूनअखेर ३ लाख २२ हजार १८ टन विविध प्रकारच्या खतांची विक्री झाली. परिणामी, त्यानंतरही सुमारे २ लाख ९० हजार ८५६ टन खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध होता..२३ हजार ७८३ टन खतांचा बफर साठाछत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत १९ जूनअखेर युरिया व डीएपी या खतांचा एकूण २३ हजार ७८३ टन बफर साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये २१ हजार ४६५ टन युरिया आणि २ हजार ३१८ टन डीएपी खताचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तीनही जिल्ह्यांसाठी एकूण २६ हजार ३५० टन युरिया व डीएपी खतांचा संरक्षित साठा ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.