Banana market price agrowon
Video

Papaya and banana market: बाजारात रमजान सणामुळे पपई आणि केळीच्या मागणीत वाढ

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण पपई, केळी, बाजरी, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठाव आहे. राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे. त्यामुळे पपईला सध्या १७०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. रमजानमुळे केळीला मागणी आहे. केळीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. सध्या बाजारात सरासरी १८०० ते २ हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. बाजरीला सध्या देशात मागणी टिकून आहे. सध्या बाजरीला सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई आली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १० डाॅलरवर होते तर सोयापेंड ३०० डाॅलरवर होते. बाजारात आजही सोयाबीन ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. देशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरुच आहेत. बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

SCROLL FOR NEXT