Niger seed farming agrowon
Video

Niger seeds: खुरासणी लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान कोणतं?

oilseed crop: खुरासणी (कारळा) हे एक महत्त्वाचे तेलबिया पीक असून, याचा उपयोग पोषणमूल्यांनी भरलेले खाद्यतेल मिळवण्यासाठी, पिकांचे वैविध्य राखण्यासाठी आणि मधमाश्यांचे संवर्धन करण्यासाठी होतो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि आपत्कालीन परिस्थितीत टिकून राहणारे हे पीक अल्प व अधिक पाण्यातही तग धरते.

Team Agrowon

Niger seeds variety selection: डोंगर उतारावर, कमी कसदार आणि हलक्या जमिनीत देखील हे पीक घेता येते. यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो आणि रानटी जनावरे हे पीक खात नाहीत. श्रावण महिन्यात ग्रामीण भागात याची भाजी केली जाते, तर याचे तेल त्वचा विकार व जखमांवर वापरले जाते.

पेरणी कालावधी: जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेर करावी. उशिरा खरीप हंगामातही पीक उत्तम येते.

जमीन: भुसभुशीत, पोयटायुक्त, निचरा चांगला असलेली डोंगर उताराची जमीन उपयुक्त.

बियाणे: हेक्टरी ४ ते ५ किलो, ३०×१० सेमी अंतरावर ओळीने पेरणी करावी.

बियाणे प्रक्रिया: प्रति किलो २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ३ ग्रॅम थायरम, नंतर २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू.

खत व्यवस्थापन: ४ टन शेणखत, पेरणीवेळी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद, आणि ३० दिवसांनी २० किलो नत्र.

निंदणी व खुरपणी: पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी विरळणी, नंतर ३० व ६०-६५ दिवसांनी खुरपणी.

मधमाशी संवर्धन: एकरी एक मधमाशी पेटी ठेवल्यास उत्पादनात २०-२५% वाढ.

शेंडा खुडणी: पेरणीनंतर ५० दिवसांनी शिफारस.

काढणी कालावधी: साधारणतः १२० दिवसांत पीक तयार, सरासरी उत्पादन ५०० किलो प्रति हेक्टर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Officer Threat: सभापतींच्या कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याच्या धमकीने खळबळ

Symbiosis University: पुणेकरांच्या साक्षीने ज्ञानयोग्याचा सन्मान

Agri Reforms: राष्ट्रीय बाजारतळ उभारणीसाठी अधिनियमात होणार सुधारणा

Banana Export: माळशिरसमधून दररोज १० टन केळीची निर्यात

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

SCROLL FOR NEXT