Fodder management agrowon
Video

Fodder Management: चारा टंचाई रोखण्यासाठी काय उपाय करावेत?

सध्या चारा टंचाई आणि पशुखाद्याचे वाढते दर लक्षात घेता पशुपालकांनी चारा टंचाईवर मात करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

Team Agrowon

उन्हाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होतेचं.त्यामुळे सध्या जो चारा उपलब्ध आहे त्याचं व्यवस्थित नियोजन करुन चाऱ्याचा वापर करावा. त्यासाठी चारा कुट्टी करून जनावरांच्या शारीरिक गरजेनुसार द्यावा. विनाकारण जास्तीचा चारा जनावरांना देवू नये. गोठ्यातील जनावरांची त्यांच्या अवस्थेनुसार वर्गवारी करून त्यांना चाऱ्याची किती गरज आहे त्या प्रमाणातच चारा द्यावा. चारा जमिनीवर न टाकता गव्हाणीत द्यावा. जेणेकरून चारा तुडवून खराब होणार नाही. चारा टाकलेल्या गव्हाणीत मोठी जनावरं किंवा लहान वासरे जाऊन चारा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. कडब्याची पेंढी सोडून जशीच्या तशी जनावरांना खाण्यास न देता कुटटी करून द्यावी. एकाचवेळी जास्त चारा न टाकता विभागून द्यावा. जेणेकरून चाऱ्याचा जास्त अपव्यय होणार नाही. वाळलेल्या चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ आणि मीठ एक टक्का या प्रमाणात फवारून रात्रभर झाकून ठेवून सकाळी जनावरांच्या आहारात वापर करावा. यामुळे चारा न खाता वाया जाणार नाही.वाळलेल्या चाऱ्याचे पचन वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्सचा जनावरांच्या आहारात वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance: यंदाही पीक कापणीवर आधारित विमा योजना

Maharashtra Heatwave Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका ठरतोय तापदायक

Fertilizer Management: उत्पादकता वाढीसाठी संतुलित खत व्यवस्थापन गरजेचे : कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या बदलासाठी प्रयत्न करू

DAP Fertilizer Shortage: पेरणीच्या तोंडावर डीएपी खताचा तुटवडा

SCROLL FOR NEXT