Monsoon Update Monsoon Update
Video

Monsoon Update: महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस कधीपासून पडू शकतो?

Rain Update: पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव आणि चांदवड तालुक्यात १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.

Team Agrowon

Weather Update: एमजेओ आणि महाराष्ट्रातील पावसाचा संबंध आहे का? याविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की,  'एमजेओ' अर्थात मॅडन ज्यूलियन ऑसिलेशनची विषुववृत्तीय मार्गक्रमणातील वारी सध्या भारतदेश समुद्रीय क्षेत्रातून २७ जून ते १० जुलै दरम्यान मार्गस्थ होत आहे. त्याची बळकटी दाखवणारा 'आम्प्लिटुड' एकच्या आसपास आहे. 'एमजेओ' च्या ह्या वारीचे जेंव्हा २७ जूनला अरबी समुद्रातून प्रयाण झाले तेंव्हा मरगळलेला माॅन्सून सक्रिय झाला. तो सह्याद्रीचा घाट चढला. आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात २७ जूनपासून तो मध्यम पाऊस देत आहे. एमजेओच्या या वारीने सध्या बंगाल उपसागरात प्रवेश केला आहे. माॅन्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेलाही त्यामुळे बळ मिळू लागले आहे व मराठवाड्यात ६ जुलैपासून तर विदर्भात आजपासूनच पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व आसामकडील ७ राज्यात १० जुलैपर्यंत अतिजोरदार ते अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यताही त्यामुळे जाणवत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT