Fertilizer Use Methods agrowon
Video

Fertilizer Use: खत ओळीने देण्याची योग्य पद्धत

जास्त उत्पादन मिळाव यासाठी पिकाला भरमसाठ खते दिली जातात. या खताचा पिकाद्वारे कार्यक्षम वापर होतोय किंवा नाही हे मात्र तपासले जात नाही. पीक उत्पादनाच्या दृष्टीने खतांचा वापर करताना योग्य खतांची निवड, योग्य मात्रा, योग्य पद्धत आणि योग्य वेळेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. तरच आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवू शकतो.

Team Agrowon

पीक उत्पादन वाढवण्यासाठी खतांची निवड, मात्रा, वेळ आणि योग्य पद्धतीचा वापर महत्त्वाचा असतो. काही पिकांना खते पेरणीच्या वेळीच दिली जातात. सेंद्रिय खते (शेणखत, गांडूळ खत) पेरणीपूर्वी जमिनीत मिसळली जातात. जमिनीतून खते दिल्यास नत्राचा ऱ्हास आणि स्फुरदाचे स्थिरीकरण अधिक होते. त्यामुळे खत समप्रमाणात न बसल्यास पिकांची वाढ असमान होते. पाण्यात विरघळणारी खते जमिनीवर न पसरविता ती जमिनीत मोगड्याच्या साह्याने १० ते १५ सेंमी खोलीवर आंतरपिकांना देतात किंवा ऊस, कापूस, भाजीपाला पिकांना अर्धा फूट बाजूने कुदळीच्या साह्याने खोली घेऊन खत मातीआड करतात. पाण्यात विरघळणारी रासायनिक खते आणि भूसुधारके खोलवर देऊ नयेत. दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून दिल्याने खतांची कार्यक्षमता वाढते. दाणेदार खते पेरणीसाठी योग्य असतात.खते ओळीत पेरल्यामुळे खत बियाण्याच्या बाजूला दोन ते तीन सेंटिमीटर आणि खाली दोन ते तीन सेंटिमीटर पडते. उभ्या पिकामध्ये प्रत्येक ओळीच्या एका बाजूला खुरप्याच्या साह्याने उथळ सऱ्या पाडून किंवा कोली घेऊन खते घालून मातीने बुजवावीत. विशेषत: भाजीपाला पिके, मका, ज्वारी, ऊस, कापूस या पिकांना खते ओळीत देण्याची पद्धत उपयुक्त आहे. फळझाडांसाठी "आळे पद्धत" वापरली जाते. झाडाच्या सावलीच्या आतील भागात ९ इंचाचे आळे करून त्यात खते देतात. ही पद्धत खतांचा प्रभाव वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price: देशात कापसाचे दर नरमले

Maharashtra GSDP: राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित

Crop Compensation Issue: सुधारित पीकविमा योजनेमुळे भरपाईला ठेंगा

Fertilizer Shortage: देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT