Dhananjay Munde Agrowon
Video

Dhananjay Munde: पीक विम्यासाठी काही शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रुपये घेतल्याचे प्रकार उघडकीस

Pik Vima Yojana: विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना १ रुपयाची रक्कम देणं अपेक्षित आहे.

Team Agrowon

Maharashtra Farmer: राज्यातील काही सीएससी शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रुपये घेत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. त्यामुळं एक रुपयाची घोषणा असताना शेतकऱ्यांकडून शंभर दोनशे रुपये जादा उकळण्याचा प्रकार सुरूय. वास्तवात केंद्र चालकांना विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी ४० रुपये मानधन केंद्र सरकारनं निश्चित केलेलंय. म्हणजे एक अर्ज भरला की, सीएससी चालकांना विमा कंपनीकडून ४० रुपये दिले जातात. त्यामुळं शेतकऱ्यांनी अर्ज करताना १ रुपया देणे अपेक्षित आहेत. पण काही केंद्र चालक त्याला हरताळ फासत शेतकऱ्यांकडून जादा पैसे उकळत आहेत. अशा केंद्रावर सरकार कारवाई का करत नाही, असा शेतकऱ्यांच्या प्रश्न आहे. त्यामुळं एक रुपयात विमा नेमका आहे कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी की, सीएससी चालकांसाठी? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागलेत. गेल्यावर्षी देखील १ रुपयांत विम्याची घोषणा केली पण सीएससी चालकांनी शेतकऱ्यांनी जादा पैसे उकळले होते. त्यावरून शेतकरी तक्रारही करत होते. पण कृषिमंत्री मुंडे मात्र कारवाईचा इशारा देत वेळ मारून नेली, असा आरोप शेतकरी करतात. सीएससी चालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT