aale bhaav agrowon
Video

Cotton Price: कापूस दर स्थिर; तसेच काय आहेत कोबी, केळी, आवळा आणि आल्याचे आजचे बाजारभाव

market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, कोबी, केळी, आवळा आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत

Team Agrowon

ginger price: मागील आठवडाभरात आल्याच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली. आल्याचे भाव आता सरासरी ३ हजार ५०० रुपये ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील आवळ्याची आवक पावसामुळे कमी झाली आहे. बाजारात आवळ्याला उठाव मात्र चांगला आहे. सध्या बाजारात आवळ्याला सरासरी ४ हजार ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. केळीला बाजारात सध्या चांगला दर मिळत आहे. बाजारातील केळीला चांगला उठाव आहे. किरकोळ बाजारात केळी ३० रुपये ते ७० रुपये प्रतिडझन मिळत आहे. तर घाऊक बाजारात सध्या केळीला १८०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. बाजारात कोबीची आवक कायम आहे. कोबीला सध्या सरासरी प्रतिक्विंटल १८०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. सध्या बाजारात १५ हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव ६८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. देशात सध्या कापूस ७ हजार ४०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Crisis: गॅस टंचाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल, 'एपस्टिन'चा उल्लेख, लोकसभेत प्रचंड गदारोळ

Satbara Distribution: एकाच दिवशी साडेतीन हजार सातबारांचे वाटप

Solar Pump Scheme Fraud: सौर कृषिपंप मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

Sugarcane Weight Manipulation: कारखान्यांच्या वजन काट्यांप्रश्नी लोकायुक्तांकडे दाद मागणार

Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले, कापूस आवक स्थिर, कारल्याचा भाव टिकून, कांदा दबावात, खरबुजाला उठाव

SCROLL FOR NEXT