Cotton price agrowon
Video

Cotton Rate: कापसाची आवक एप्रिल महिन्यात निम्म्याने घटली

देशातील बाजारात कापसाठी आवक मागच्या दोन तीन आठवड्यांपासून खूपच कमी झाली. त्यामुळे दरात चांगली सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सीसीआयने कापसाची विक्री सुरु केल्याने दरावर परिणाम झाला आहे.

Team Agrowon

देशातील कापूस उत्पादन यंदा घटले. उत्पादन २९१ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. त्यापैकी सीसीआयने तब्बल ११० लाख गाठींची खरेदी केली. म्हणजेच देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल ३५ टक्क्यांच्या दरम्यान एकट्या सीसीआयने खेरदी केली. म्हणजेच देशातील सर्वात मोठा कापसाचा स्टाॅकीस्ट सीसीआय आहे. त्यामुळे सीसीआय कापसाची विक्री कशी करते, विक्रीचे भाव कसे ठवते याकडे बाजाराचे लक्ष होते. तसेच याचा बाजारावर परिणाम देखील होणार होता. देशात उत्पादन घटले. पण उद्योगांचा कापूस वापर चांगला आहे. त्यामुळे कापसाला मागणी आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत. देशात भाव हमीभावापेक्षा कमी होते तेव्हाही आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव कमीच होते. त्यामुळे उद्योगांनी गरजेप्रमाणे कापसाची खरेदी केली. स्टाॅक करण्यास उद्योगांनी रस दाखवला नाही. त्यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी असतानाही सीसीआयला जास्त कापूस मिळत गेला. उद्योगांची खरेदी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Procurement: सात-बारावर पीकपेरा नसतानाही ५३८४ क्विंटल ज्वारीची खरेदी

Farmer Support: पशुपालनाला आता ‘कृषी’च्या धर्तीवर सवलतीत वीजपुरवठा

Agriculture Department: कृषी विभागातील अकार्यकारी पदे घोषित

Sugarcane Price: उसाला ३३०० रुपये दर निश्चित

Commercial Farming: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रुजविला व्यावसायिक शेती पॅटर्न

SCROLL FOR NEXT