Cotton Crop Management Agrowon
Video

Cotton Crop Management: कपाशीतील पातेगळवरील नियंत्रण

Cotton Pategal: कपाशीची मुळे सुमारे १०० सेंटीमीटर खोलवर जात असल्यामुळे कपाशी लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड केली पाहिजे.

Team Agrowon

Cotton Crop Care: पाणथळ जमिनीत फुले लागण्याच्या काळात जर पाणी साचून राहीलं, तर मोठ्या प्रमाणात पातेगळ होते. त्यामुळे पाणथळ जमिनीत कपाशी लागवड करण टाळाव. पेरणीची वेळ ही कपाशीमध्ये फार महत्त्वाची आहे. शक्यतो जून महिन्यात पेरणी उरकून घ्यावी. १५ जुलै नंतर पेरणी करू नये, कारण उशिरा पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पातेगळीची जास्त समस्या येते. कपाशीमध्ये काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. कापूस वाढीसाठी वाफसा स्थिती आवश्यक असते. त्यामुळे शक्यतो कपाशी पिकासाठी ठिबक सिंचन करावं. शेतात पाणी साचू देऊ नये किंवा जास्त काळ पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. पिकात अन्नद्रव्यांच प्रमाण कमी झालं की पातेगळ होते. त्यामुळे माती परीक्षण करून त्याच्या अहवालाप्रमाणे शिफारशीत खतमात्रा देणं गरजेचं असतं. विशेष करुन खतामध्ये नत्रयुक्त खतांची मात्रा ३ ते ४ हप्त्यांमध्ये विभागून द्यावी. अनेक शेतकरी सुरवातीला जास्त युरियाचा वापर करत असल्यामुळे झाडांची शाकीय वाढ जास्त होते. मात्र उत्पादनामध्ये घट येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT