लागवड ओट चारापिकाची... 
चारा पिके

लागवड ओट चारापिकाची...

डॉ. विठ्ठल कौठाळे, प्रमोदकुमार ताकवले

संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा विचार करून ओट या चारापिकांची लागवड करावी. ओट हे जोमाने वाढणारे पौष्टीक व पालेदार चारापीक आहे. ओट  हे जोमाने वाढणारे लुसलुशीत, पौष्टीक, पालेदार एकदलवर्गीय चारापीक आहे. बरसीम, लूसर्ण या द्विदलवर्गीय चारापिकाबरोबर ओटचा चारा मिसळल्यास जनावरांना संतुलीत व पोषक आहार मिळतो. ओट हिरवा चारा म्हणून वापरतात. त्याचबरोबरीने जास्तीच्या हिरव्या चाऱ्याचे मूरघासामध्ये रूपांतर करून किंवा वाळवून जेव्हा चाऱ्याचा तुटवडा असेल तेव्हा त्याचा वापर करता येतो.

पौष्टीकता ः ८ ते १० टक्के प्रथिने व १८ ते २० टक्के शुष्क पदार्थ. चाऱ्याची पचनीयता ६५ ते ७० टक्के . लागवडीचे तंत्र ः  

  • थंड व दमट हवामान ओटच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. धुके व अतिथंड हवामान पिकाच्या वाढीस मारक आहे. त्यामुळे सध्याच्या काळात पेरणी पूर्ण करावी.
  • पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते पोयट्याच्या जमिनीमध्ये चांगली वाढ होते. जमिनीचा सामू साधारणतः ७ ते ८ पर्यंत असावा. परंतु ८.५ च्या पुढे सामू असलेल्या जमिनीत ओट चांगले वाढत नाही.
  • पेरणी दोन ओळीतील अंतर २५ सें.मी. ठेवून पाभरीने करावी.
  • केंट, आर ओ -१९, जे एच ओ -८२२ या सुधारीत जातींची लागवड करावी. हेक्टरी १०० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रतिदहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • जमीन नांगरटीनंतर आणि कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत समप्रमाणात पसरवून द्यावे. पेरणीच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे.
  • पेरणी करण्यापूर्वी जमीन ओलवून घेतल्यास बियाण्याची उगवण चांगली होते. त्यासाठी पेरणीपूर्वी पाच ते सात दिवस अगोदर जमिनीची ओलवणी करावी. जमिनीत वापसा येताच बियाण्यांची पेरणी करावी. बियाण्यांच्या उगवणीनंतर पाण्याची पहिली पाळी आठवड्याने द्यावी. नंतरच्या पाण्याच्या पाळ्या दर पंधरा दिवसांच्या अंतराने द्याव्यात. याप्रमाणे साधारणतः चार ते पाच पाण्याच्या पाळ्यांमध्ये पीक कापणीस तयार होते.
  • या पिकात जंगली ओट व इतर रूंद पानांची तणे आढळून येतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, उत्पादन कमी येते. खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
  • संपर्क  ः ०२०-२६९२६२६५ (बाएफ मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरळी कांचन, जि. पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shibu Soren Dies: झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन

    Pulses Antinutrients : उडीद, हरभरा, मुगामधील प्रतिपोषक घटकांचे नियंत्रण

    Tipeshwar Wildlife Sanctuary : टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

    Seaweed: पीक पोषणासाठी समुद्री शेवाळ अर्क

    Krishi Seva Kendra Bbhandara : भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

    SCROLL FOR NEXT