चंदनाच्या लागवडीमध्ये सहयोगी वृक्षाची लागवड करावी. 
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची

चंदन लागवड

वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

चंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे. श्वेतचंदन आणि रक्तचंदन हे दोन्ही वृक्ष वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत. चंदन चिबड जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो. पाण्याचा निचरा होणारी डोंगराळ जमीन, उत्तम गाळाची, काळी माती व नदी-नाल्याच्या काठच्या जमिनीत याची चांगली वाढ होते.

  •     चंदनाचे झाड काहीअंशी परोपजीवी असल्याने त्याची वाढ होण्याकरिता सहयोगी वृक्षाची आवश्‍यकता असते. नैसर्गिक जंगलात चंदनाची वाढ शिरस, धावडा, बाभूळ, गिरिपुष्प, टेटू, बोर, सिसू, कडुलिंब, करंज इत्यादी वृक्षांच्या समूहात होते.
  •  रोपांची लागवड ४ मीटर बाय ४ मीटर अंतराने करावी. चंदनाला सहयोगी वृक्षाची गरज असल्याने दोन चंदनाच्या झाडामध्ये एक वृक्ष प्रजाती लावावी. जेणेकरून त्याला कायमस्वरूपी आधार मिळेल. यासाठी सुरू, मॅजियम, जांभूळ, डाळिंब, पेरू, करवंद, नीम, मेलिया डुबिया यांची निवड करावी.
  •  सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत. सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी. चंदनाच्या रोपांची मुळे वृक्षाच्या मुळांशी जोडली गेल्यानंतर तूर काढावीत. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते.
  •  व्यावसायिक काढणीचा काळ १५ वर्षांचा असतो. चंदनाची प्रजाती तोडण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे आहे. लागवड केल्यानंतर जमिनीच्या सातबारा नमुन्यामध्ये नोंद करावी. लागवडीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  •  - ०२३५८- २८२७१७ वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Yeramala Yatra: येडेश्वरी देवीच्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

    Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान

    Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले

    Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात

    Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

    SCROLL FOR NEXT