करवंद लागवड  
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची

करवंदाची लागवड कशी करावी?

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

करवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. ते हलक्‍या, मुरमाड, तसेच कातळ असलेल्या जमिनीतही चांगले येते.करवंदाच्या जाती फळाच्या आणि गराच्या रंगावरून ठरविल्या जातात.

  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण करवंद बोल्ड'' नावाची नवीन जात प्रसारित केली आहे. या जातीची फळे मोठी (१२-१६ ग्रॅम) व घोसाने लागतात, तसेच फळाची प्रत उत्कृष्ट आहे. फळे गोलाकार असून, गराचे प्रमाण ९२ टक्के आहे. फळांचा टिकाऊपणा चांगला आहे. फळे गडद काळ्या रंगाची असतात. कच्च्या व पक्व फळांपासून विविध प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.
  • कुंपणासाठी लागवड करताना दोन रोपांतील अंतर ९० ते १५० सें. मी. ठेवावे, सलग लागवड करताना तीन ते चार मीटर अंतरावर कलमे लावून लागवड करावी. लागवड केल्यावर कलमांना आधार द्यावा. लागवडीसाठी एप्रिल-मे महिन्यात ४५ x ४५ x ४५ सें.मी. आकाराचे खड्डे खणून माती, चांगले कुजलेले शेणखत (दोन किलो) आणि २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर भरून ठेवावे. कलम लावल्यानंतर हिवाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने व उन्हाळ्यात आठवड्याच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या लागवडीच्या पहिल्या वर्षी द्याव्यात, म्हणजे कलमांची वाढ जोमदारपणे होईल. कलमांचे जगण्याचे प्रमाण वाढेल.
  • संपर्क : ०२३५८- २८०५५८ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agricultural Pumps Power Connections: महावितरणकडून १३ हजारावर कृषीपंपांना वीजजोडण्या

    Sugarcane Smut Disease: उसावरील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण कसे करावे?

    Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित

    Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?

    Mohol-Tandulwadi Highway Project: मोहोळ-तांदूळवाडी महामार्गावरून सोलापुरात ‘श्रेयवाद’

    SCROLL FOR NEXT