Highway Funding: सोलापूर शहरासाठी ‘बायपास’ ठरणार असलेल्या मोहोळ ते तांदूळवाडी या महामार्गाच्या ८१ किलोमीटर टप्प्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे ७४० कोटी रुपयांचा निधी मंजूर होताच, या कामाच्या श्रेयावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख व सचिन कल्याणशेट्टी यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे..राष्ट्रीय महामार्ग विभागाने १०७ किलोमीटरचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मोहोळ ते वळसंग या ८१ किलोमीटर मार्गाला ७४० कोटींची आंशिक मंजुरी मिळाली आहे..Nashik-Akkalkot Highway Project: टेंडरमध्ये अडकला नाशिक-अक्कलकोट महामार्ग.याचा मार्ग : मोहोळ - कुरुल - कामती - तेरा मैल - औराद - बंकलग - कणब - वळसंग असा आहे.या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या ५ ते ७ मीटर रुंद असलेला हा रस्ता आता १० मीटरचा होणार असून, यात नवीन पुलांची उभारणी आहे. पण या महामार्गावरुन आता श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले असून, खासदार प्रणिती शिंदे यांनी या महामार्गासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असून, केंद्र सरकारकडे वजन वापरल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे..Farm Road Development: पाणंद रस्त्याच्या कामांना मिळणार गती.तर दुसरीकड़े आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी “या निधीसाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. काही लोक कोणतेही काम न करता केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या पाठपुराव्याचे पुरावे द्यावेत,” असे थेट आव्हान आमदार कल्याणशेट्टी यांनी दिले आहे. तर दुसरे भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनीही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून या मंजुरीचे श्रेय घेत, केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. .महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अनिस खराडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गाच्या कामाची अधिकृत घोषणा पुढील दोन दिवसांत केली जाईल. हा मार्ग मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन मतदारसंघांतून जात असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या श्रेयवादाला अधिक धार चढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.