Agri Economy: नांदेड जिल्ह्यात आगामी २०२६-२७ खरीप हंगामासाठी विविध पिकांसाठी प्रतिहेक्टरी पीककर्ज दर निश्चित करण्यात आले आहेत. उत्पादन खर्च वाढ लक्षात घेऊन यंदा कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. परंतु यंदा पीककर्ज माफीच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज वाटपाला दिरंगाई होण्याची शक्यता आहे..जिरायती पिकांमध्ये कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन व तिळासाठी प्रतिहेक्टरी सुमारे ३४ हजार ते १.१३ लाख रुपयांपर्यंत कर्जमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यात बीटी कापूसासाठी सर्वाधिक १.१३ लाख, तर मूग व उडीदसाठी किमान ३४ हजार रुपयांची तरतूद आहे..Crop Loan Limit: यवतमाळ जिल्ह्यासाठी पीककर्ज मर्यादेत हेक्टरी वाढ.बागायती व हंगामी पिकांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग, सूर्यफूल व संकरित मका यांसाठी ४४ हजार ते ६५ हजार रुपयांदरम्यान कर्जदर निश्चित करण्यात आला आहे. उन्हाळी भुईमूगासाठी ६५ हजार, तर सूर्यफूलासाठी ४४,५०० रुपये कर्ज उपलब्ध राहणार आहे. फळबाग व भाजीपाला पिकांसाठी तुलनेने जास्त कर्जमर्यादा ठेवण्यात आली आहे. डाळिंबासाठी सर्वाधिक २.२० लाख, संत्र्यासाठी १.४९ लाख, टोमॅटोसाठी १.३५ लाख, तर मिरचीसाठी १.२० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे..Crop Loan Distribution: परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण.वांग्यासाठी किमान ६४,२५० रुपये कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बारमाही पिकांमध्ये ऊस, केळी व हळद यांसाठीही मोठी कर्जमर्यादा देण्यात आली आहे. ऊसासाठी सुमारे १.५१ लाख ते १.७० लाख, केळी टिश्यूकल्चरसाठी १.८० लाख, तर हळदीसाठी १.७५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध राहणार आहे. .या सुधारित कर्जदरामुळे बियाणे, खते, औषधे व मजुरी खर्च भागविणे शेतकर्यांना सोपे होणार असून खरीप हंगामातील पेरणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.