तृणधान्ये

गहू लागवड कशी करावी?

डॉ. भरत रासकर

जिरायती भागात पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तर बागायती पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास फुटव्यांची संख्या, ओंबीची लांबी,ओंबीतील दाण्यांची संख्या, दाण्याचा आकार आणि वजन वाढून उपेक्षित उत्पादन मिळते. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्‍टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. काही भागात उसाची तोडणी झाल्यानंतर गव्हाचे पीक घेतले जाते. परंतू १५ डिसेंबरनंतर गव्हाचे पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. जिरायती भागासाठी पंचवटी, नेत्रावती, बागायती भागासाठी त्र्यंबक,तपोवन,गोदावरी,फुले समाधान आणि बागायती उशिरा पेरणीसाठी   एनआयएडब्ल्यू ३४ या जातीची निवड करावी. वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी १०० ते १२५ किलो  आणिउशिरा पेरणीसाठी  हेक्‍टरी १२५ ते १५० किलो बियाणे लागते. पेरणीपुर्वी थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर व २५० ग्रॅम पीएसबी  जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणी  करताना दोन ओळींत २० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणीस उशीर झाल्यास दोन ओळींत १८ सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. यामुळे उगवण चांगली होते. ट्रॅक्‍टरने पेरणी करत असताना बियाणे ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा प्रवाह, जमिनीचा उतार व प्रकार लक्षात घेऊन  २.५ ते ३ मीटर रुंदीचे सारे पाडावेत. माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्याची मात्रा द्यावी. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी ८ ते १० टन पूर्ण कुजलेले शेणखत आणि लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीत २० किलो हिराकस हे १०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून नंतर द्यावे.  जिरायत पेरणी करताना संपूर्ण नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. गव्हाच्या बागायत वेळेवर पेरणीसाठी सरळ खते किंवा मिश्र खते यांच्या उपलब्धतेनुसार द्यावे.

संपर्क  ः डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७ कृषी संशोधन केंद्र, निफाड,जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT