Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Non-Basmati White Rice Exports to Mauritius : भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी घातली असतानाच मॉरिशसला तांदूळ निर्यातीची मान्यता दिली आहे.
Rice Export
Rice ExportAgrowon

Pune News : केंद्र सरकारने गेल्या ११ महिन्यांपासून देशात तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यानंतरही अनेक देशांना भारतातून तांदूळ पाठवण्यात आला आहे. आता मॉरिशसला १४००० टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत विदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सोमवारी (ता. ०६) अधिसूचना काढली आहे. यात म्हटले आहे की, नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत मॉरिशसला १४,००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे

देशांतर्गत तांदळाच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारने २० जुलै २०२३ पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. परंतु सरकार काही देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच्या विनंती करून निर्यातीस परवानगी दिली आहे. यापूर्वी भारताने टांझानिया, जिबूती आणि गिनी-बिसाऊसह काही आफ्रिकन देशांना तांदूळ पाठवला आहे

Rice Export
Rice Export: भारताची बासमती तांदळाची बाजारपेठ पाकिस्तानने बळकावली?
Rice Exports
Rice Exports Agrowon

याशिवाय बासमती नसलेला पांढरा तांदूळ नेपाळ, कॅमेरून, कोटे डी आयव्हरी, गिनी, मलेशिया, फिलीपिन्स आणि सेशेल्स या देशांमध्ये निर्यात करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

Rice Export
Rice Export : तीन देशांना तांदूळ निर्यातीस मान्यता

तांदूळ NCEL मार्फत पाठविला जाईल

एनसीईएल किंवा नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड ही सहकारी संस्था अनेक राज्यांमध्ये सक्रिय आहेत. तर अमूल, इफको, कृभको आणि नाफेड या देशातील काही आघाडीच्या सहकारी संस्था निर्यात करण्यात भाग घेतात.

तांदळाच्या निर्यातीवर बंदी कायम

केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये ३१ मार्च २०२४ नंतरही तांदूळ निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क सुरू ठेवण्याची घोषणा केली होती. याशिवाय ३१ मार्चनंतरही तांदळाच्या निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क कायम राहणार असल्याची घोषणा केली होती. भारताने मे २०२२ मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै २०२३ मध्ये गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com