Farm Mechanization Agrowon
टेक्नोवन

Farm Mechanization : एकसमान पेरणीसाठी ही आहेत विविध टोकण यंत्रे

Kharif Sowing : बहुतांश खरीप पिकांची पेरणी टोकणपद्धतीने केली जाते. बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा प्रकार बदलू शकतो. काही पिकांच्या पेरणीमध्ये दोन ओळीतील अंतर समान राखावे लागते, तर काही पिकांच्या दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर एकसमान ठेवावे लागते.

Team Agrowon

Tokan Machines : मॉन्सूनच्या आगमनानंतर लवकरच पेरणीला सुरुवात होईल. बहुतांश खरीप पिकांची पेरणी टोकणपद्धतीने केली जाते. बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा प्रकार बदलू शकतो.

काही पिकांच्या पेरणीमध्ये दोन ओळीतील अंतर समान राखावे लागते, तर काही पिकांच्या दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर एकसमान ठेवावे लागते. बियाणे टोकण यंत्र वापरल्यास टोकण करताना वाकावे लागत नाही.

चालता चालता उभे राहून सहजरीत्या टोकण करता येते, यामुळे लागणारे श्रम व थकवा कमी होऊन मजुरांची कार्यक्षमता वाढते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध टोकणयंत्रे विकसीत केली आहेत. 

1) बैलचलित टोकण यंत्र

हे यंत्र एक बैलजोडीच्या साह्याने चालणारे आहे. या यंत्राची कार्यक्षमता २.३३ हे प्रति दिवस इतकी आहे.

2) ट्रॅक्टरचलित टोकण यंत्र

हे यंत्र ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते. या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.

3) ट्रॅक्टरचलित न्यूमॅटिक टोकण यंत्र

४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते. हवेच्या दाबावर कार्य करत असल्यामुळे बियाण्यांची बचत होते. या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, तूर इ. पिकांची पेरणी करता येते.

एका दिवसात ३.५० ते ४ हेक्टर क्षेत्रावर टोकण करता येते. पेरणीच्या अचूकतेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. पेरणीची खोली एक समान असल्यामुळे चांगले उत्पादन येते. पेरणीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही नुकसान होत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT