Agriculture Drone Agrowon
टेक्नोवन

ड्रोन फवारणीसाठी ४७७ कीडनाशकांना केंद्रांची मंजुरी

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून कीडनाशकांची फवारणी करू शकणार आहेत. तत्पूर्वी प्रत्येक कीडनाशकाला केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीची (CIB&RC) परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

Team Agrowon

कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या वापराला गती देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने ड्रोन फवारणीसाठी ४७७ कीडनाशकांना हंगामी स्वरूपाची परवानगी दिली आहे. ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाने (DFI) ही माहिती दिली आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून कीडनाशकांची फवारणी करू शकणार आहेत. तत्पूर्वी प्रत्येक कीडनाशकाला केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीची (CIB&RC) परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. ही परवानगी १८ ते २४ महिन्यांच्या कालावधीत दिली जाते.

या ४७७ नोंदणीकृत कीडनाशकांत कीटकनाशक, बुरशीनाशक आणि वनस्पती वाढ नियामकांचा समावेश आहे. येत्या २ वर्षांत या कीडनाशकांचा ड्रोनच्या माध्यमातून व्यावसायिक वापर शक्य होणार आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने (CIB&RC) या कीडनाशकांना हंगामी मान्यता दिली असल्याचे डीएफआयने (DFI) आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

या कीडनाशक कंपन्यांनी यापूर्वीच वापरासंबंधी केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीकडे (CIB&RC) नोंदणी केलेली आहे. या नव्या संमतीच्या माध्यमातून पिकांचे प्रकार, कीडनाशकांचे प्रमाण, माहिती संकलनाचा कृती आराखडा इत्यादी माहितीची नोंद केली जाणार आहे.

या २ वर्षांनंतरही संबंधित कंपन्यांना ड्रोनच्या माध्यमातून फवारण्या करणे सुरूच ठेवायचे असेल, तर त्यांना हंगामी काळातील अत्यावश्यक माहिती केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीकडे जमा करून तशी संमती घेता येणार असल्याचेही डीएफआयने (DFI) नमूद केले आहे.

कृषी क्षेत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोन्समध्ये पोषक घटक, कीडनाशकांच्या फवारण्या, शेतीची पाहणी, माती आणि पीक परीक्षण अशा अनेक सुविधा उपलब्ध असणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या फवारण्यांमुळे रासायनिक कीडनाशकांचा, मानवी आरोग्यास हानिकारक खतांचा मानवांशी संपर्क होणार नसल्याचे डीएफआयचे अध्यक्ष स्मित शहा यांनी सांगितले आहे.

येत्या तीन वर्षात 'एक गाव एक ड्रोन' अभियान राबवण्यात येणार आहे. एकदा का केंद्र सरकारचे ड्रोन वापराबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आणि द्रोण खरेदीसाठी सरकारी अनुदान सुरु झाले की देशभरातील शेतकऱ्यांना ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्याची सवय लागेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर बेकायदशीर: छगन भुजबळ

Paddy Farming : भातपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव

Dragon Fruit Plantation: ड्रॅगन फ्रूट लागवडीची योग्य पद्धत कोणती? पीक व्यवस्थापन कसे करावे?

ZP Election : सांगली जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

Food Processing Industry : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत शेतकरी, बचत गटांना संधी

SCROLL FOR NEXT