Cotton Cultivation Agrowon
टेक्नोवन

Cotton : कापूस वेचणी यंत्राची चाचणी अंतिम टप्प्यात

देशात मजुरांच्या उपलब्धतेची समस्या आणि त्यामुळे वाढता उत्पादकता खर्च या पार्श्‍वभूमीवर कापूस वेचणीसाठी यंत्र विकसित करण्यात आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः देशात मजुरांच्या (Labour Shortage) उपलब्धतेची समस्या आणि त्यामुळे वाढता उत्पादकता खर्च (Cotton Production Cost) या पार्श्‍वभूमीवर कापूस वेचणीसाठी यंत्र (Cotton Harvesting Machine) विकसित करण्यात आले आहे. खासगी व ‘आयसीएआर’ (भारतीय कृषी संशोधन परिषद) (Indian Council Of Agriculture Research)अंतर्गत संस्थांच्या सहकार्यातून विकसित या यंत्राच्या चाचणी अंतिम टप्प्यात असून १-२ वर्षात हे यंत्र भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल, असा विश्‍वास भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा (Dr. Trilochan Mohapatra) यांनी व्यक्‍त केला.

जगात सर्वाधिक १३० लाख हेक्‍टर इतके कापूस लागवड क्षेत्र भारतात आहे. मात्र देशाची उत्पादकता कमी आणि तुलनेत उत्पादकता खर्च अशी विरोधाभासी स्थिती आहे. रासायनिक फवारण्यांवर मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च हा चिंतेची बाब ठरतो. सोबतच हंगामात कापूस वेचणीची मजुरी देखील शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर जाते. त्याची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेने भारतीय कापूस शेतीला पूरक ठरणारे वेचणी यंत्र विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

खासगी कंपन्या, संस्था, भोपाल येथील केंद्रीय अभियांत्रिकी संस्था, काऊंसिल फॉर सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च या सर्व संस्थांनी समन्वयातून तसेच स्वतंत्रपणे देखील या सयंत्रावर काम केले आहे. त्या माध्यमातून कापूस वेचणी यंत्र विकसित करण्यात यश आले आहे. त्याची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. चाचणीच्यावेळी ज्या काही सुधारणांची गरज राहते. त्या करून पुन्हा अपेक्षीत सुधारणा करून येत्या एक-दोन वर्षात हे सयंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. देशभरातील कापूस उत्पादकांची मागणी लक्षात घेता या कापूस वेचणी यंत्राची सहज बाजारपेठेत उपलब्धता व्हावी याकरिता यंत्र-अवजारे निर्माता यांच्याशी सामंजस्य करार केला जाणार आहे.

नवे वाण व रसायनावर काम

बोंड विकसित होण्याच्या कालावधीत समक्रमित (सिंक्रोनायझेशन) होणे गरजेचे राहते. त्याकरिता नवे कापूस वाण विकसित करण्यात आले आहेत. ज्याचा उपयोग यंत्राव्दारे कापूस वेचणीत प्रक्रियेत होईल. एकाचवेळी बोंड फुटले नाही तर ही सारी प्रक्रिया प्रभावित होणार आहे. त्यामुळे एकाचवेळी मॅच्युअर (परिपक्‍व) होणाऱ्या वाणाची याकरीता गरज भासेल.

या साऱ्या तांत्रिक बाबी लक्षात घेता तशाप्रकारचे वाण अपेक्षीत होते. असे काही वाण विकसित करण्यात यश आले असले तरी आणखी काही वाण असावे या करिता संशोधनात्मक काम सुरू आहे. यंत्राव्दारे कापूस वेचणीत झाडावरील पाने गळण्यासाठी डिफोलीऐशन (विघटन) प्रक्रिया राबविली जाते. त्याकरिता एका विशिष्ट रसायनाची फवारणी होते. सध्या बाजारात उपलब्ध रसायनांचा याकरिता वापर केल्यास ते फार खर्चिक आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी स्वस्त रसायनाचा पर्याय उपलब्ध व्हावा याकरिता संशोधनात्मक पातळीवर काम सुरू आहे, असेही भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

कापूस वेचणी यंत्र विकसित करण्यात आयसीएआर संस्थांना यश आले आहे. चाचणीअंती येत्या एक ते दोन वर्षात ते भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येईल. या माध्यमातून पिकाचा उत्पादकता खर्च कमी करणे शक्‍य होईल, असा विश्‍वास आहे. हंगामात कापूस वेचणीचे काम वेळकाढू व खर्चिक ठरते. त्यावर हा सक्षम पर्याय ठरेल. सोबतच यांत्रिक वेचणीसाठी नवे कापूस वाण व डिफोलीएशनसाठी भारतीय शेतीला पूरक असे रसायन देखील तयार केले जात आहे.
डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, संचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्ली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT