Soil Test 
टेक्नोवन

अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण; आयआयटी कानपूरचं संशोधन

मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी कानपूरने एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे आता मातीचे परिक्षण करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.

टीम ॲग्रोवन

वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी कानपूरने एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे आता मातीचे परिक्षण (Soil Test) करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. आयआयटी कानपूरने (IIT Kanpur) एक पोर्टेबल माती परिक्षण उपकरण (Portable Soil Testing Device) विकसित केले आहे. जे एम्बेडेड मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे केवळ ९० सेकंदात मातीच्या आरोग्याची माहिती शोधू शकते. मातीच्या गुणवत्ता तपासण्यासाठी या उपकरणामध्ये नमुना म्हणून फक्त पाच ग्रॅम माती वापरावी लागते. ९० सेकंदात सॉईल हेल्थ अहवाल - या पोर्टेबल यंत्राद्वारे माती परिक्षणासाठी भू- परिक्षकामध्ये (Bhu Parkshak) नमुन्याच्या स्वरुपात ५ ग्रॅम वाळलेल्या मातीची आवश्यकता असते. पाच सेंटींमीटर लांबीच्या दंडगोलाकार उपकरणामध्ये माती घातल्यानंतर हे उपकरण स्लत: ब्लू टूथद्वारे मोबाईलला जोडते. आणि ९० सेकंदात मातीचे विश्लेषण करण्यास सुरूवात करते. विश्लेषणानंतर चाचणीचे परिणाम जमिनीच्या आरोग्य अहवालाच्या स्वरूपात स्क्रीनवर दाखवते, असे केमिकल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक जयंत कुमार सिंह यांनी सांगितले आहे.  

उपकरणाची वैशिष्टे -   हे उपकरण मातीतील नायट्रोजन (Nitrogen), फॉस्फरस, पोटॅशिअम (Potassium), ऑर्गॅनिक कार्बन (Organic Carbon), क्ले कंटेट (Clay Content) आणि कॅटायन विनिमयाची क्षमता प्रमुख घटकांचे परिक्षण करते. याशिवाय शेत आणि पिकांसाठी लागणाऱ्या आवश्यक खतांच्या मात्रेचीही शिफारस करते. ॲपमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर केला गेला असल्याने ते हाताळायला सोपे आहे. इतके की आठवीपर्यंत शिक्षण झालेला व्यक्तीही हे उपकरण आणि ॲप वापरू शकेल. हे उपकरण १ लाख माती चाचणी नमुने तपासू शकते.   प्ले स्टोरवर ॲप उपलब्ध - अशा प्रकारचा हा पहिला आविष्कार असून, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानावर (Infrared Spectroscopy Technology) आधारित आहे, जो स्मार्टफोनवर माती परिक्षणाचा अहवाल देतो. भू-परिक्षक नावाचे हे ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे, असे आयआयटी कानपूरने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांना होणार फायदा - आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या मते, आयआयटीने विकसित केलेल्या माती परिक्षण उपकरणामुळे शेतकऱ्यांना खूप मदत होणार आहे. देशातील शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक समस्या म्हणजे माती परिक्षण करून त्याच्या अहवालाची प्रतिक्षा करणे. मात्र, या उपकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचून त्यांचा फायदा होणार आहे.

व्हिडीओ पाहा -  

दरम्यान, या उपकरणाच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या उद्देशाने याचे तंत्रज्ञान अॅग्रोनेक्स्ट (Agronxt) कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या संदर्भात ११ डिसेंबर २०२१ रोजी आयआयटी कानपूर आणि अॅग्रोनेक्स्ट सर्व्हिसेस यांच्यात तंत्रज्ञान परवाना करार झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT