Soybean Research Agrowon
टेक्नोवन

Soybean Research : सोयाबीन उगवणक्षमतेचे होणार संशोधनात्मक प्रयोग

सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी संशोधनात्मक प्रयोग घेण्यात येणार आहेत.

टीम ॲग्रोवन

परभणी ः सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता (Soybean Germination) वाढविण्यासाठी संशोधनात्मक प्रयोग (Soybean Germination Research) घेण्यात येणार आहेत. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) आणि अॅक्‍वॅटिक रेमेडीज लिमिडेट यांच्यात शुक्रवारी (ता. ७) सामंजस्य करार करण्यात आला.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्‍य करारावर विद्यापीठाच्‍या वतीने संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी, तर अॅक्वॅटिक रेमेडीज लिमिडेटतर्फे भरत मेहता यांनी स्‍वाक्षरी केली.

या वेळी सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. के. एस. बेग, बीज संशोधन अधिकारी डॉ. आर. आर. धुतमल, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, प्रणेश चांडक आदी उपस्थित होते.

सोयाबीन बियाण्यात उगवणक्षमतेची मोठी समस्‍या येते. उगवणक्षमता वाढविण्यासाठी ‘अॅक्‍वॅटिक रेमेडीज’ने इलेक्ट्रॉनिक उपकरण तयार केले आहे. त्याद्वारे २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये विद्यापीठातील बीज तंत्रज्ञान संशोधन विभागामार्फत संशोधनात्‍मक प्रयोग घेण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT