Green House Farming : वातावरणातील बदलानुसार बहुतांश शेतकरी संरक्षित शेती किंवा पॉलिहाउस शेतीकडे वळत आहेत. अचानक येणारा पाऊस, वाढते तापमान आणि अचानक पडणारी थंडी यापासून भाजीपाला पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पॉलिहाउस, शेडनेट हाउस आणि नेटहाउसमध्ये बिगर हंगामी भाजीपाला उत्पादन यशस्वीरीत्या घेता येते.
बहुतांश शेतकरी संरक्षित शेती किंवा पॉलिहाउस,कमी खर्चातील शेडनेटहाउस शेतीकडे वळत आहे. पॉलिहाउसमध्ये तसेच कमी खर्चातील शेडनेट हाउसमध्ये रंगीत ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, चेरी टोमॅटो तसेच परदेशी भाजीपाला पिकांची लागवड करता येते. कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. यासाठी या तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे.
संरक्षित शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान
पॉलिहाउस आच्छादनाकरिता अनेक थर असलेला प्लॅस्टिक पेपरचा वापर. आधुनिक जीआय तार वापरून भाजीपाला रोपांना आधार देण्याची पद्धत.
भाजीपाला रोपे निर्मितीसाठी कलम तंत्रज्ञानाचा वापर.
पॉलिहाउसमध्ये कृत्रिमरीत्या वातावरण नियंत्रित पद्धत.
स्वयंचलित खत आणि पाणी व्यवस्थापन यंत्रणेचा वापर. पाणी पुनर्वापर यंत्रणेचा वापर.
सूर्यप्रकाश नियंत्रणासाठी थर्मल शेडनेटचा वापर.
मातीविना शेती तंत्रज्ञानामध्ये माध्यम म्हणून कोकोपीट व परलाइटचा वापर. कोकोपिट ग्रोबॅगमध्ये रंगीत ढोबळी मिरची आणि टोमॅटो लागवड.
डच पद्धतीच्या वातावरण नियंत्रित पॉलिहाउसमध्ये कोकोपीट, ग्रोबॅगमध्ये रंगीत ढोबळी मिरची, टोमॅटो, हँगिंग पद्धतीने खरबूज आणि काकडी उत्पादन घेता येते.
भारतीय पद्धतीच्या पॉलिहाउस, पॉलिकम नेटहाउस आणि कीटक प्रतिबंधित नेटहाउसमध्ये निर्यातक्षम मिरची, बटर नट तसेच कोकोपीट ग्रोबॅगमध्ये परदेशी काकडीची लागवड फायदेशीर आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढल्याचे आढळून आले आहे.
अ) दोन फांदी पद्धत ः रंगीत ढोबळी मिरची
ब) एक फांदी पद्धत ः टोमॅटो आणि काकडी
जुन्या पद्धतीमध्ये काकडी व ढोबळी मिरची पिकामध्ये सर्व फांद्या बांधण्याची पद्धत होती. यामुळे पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम व्हायचा तसेच बांधणीचा मजूर खर्च वाढत होता.
नवीन पद्धतीमध्ये कमी फांद्या ठेवून सोपी बांधणी आणि उत्पादन खर्च कमी करून पिकांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे.
झाडावर टोमॅटो फळे एकसारखी येण्यासाठी फुलांचे बंच विरळ करणे शक्य होते. नवीन डच पद्धतीने टोमॅटोचे झाड ४० फूट उंचीपर्यंत वाढवता येते. या तंत्रज्ञानामुळे ४५ टक्के उत्पादनात वाढ शक्य आहे.
काकडी लागवडीमध्ये जाळी आणि हाय वायर पद्धतीचा वापर केला जातो.
पॉलिहाउसमध्ये हॅंगिंग पद्धतीने खरबूज उत्पादन तंत्र
खरबूज या पिकाची लागवड व्यापारी लागवड वाढली आहे. सध्याचे बदलते वातावरण, पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण तसेच कीड, रोगांपासून संरक्षण करण्यासाठी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे आहे.
नियंत्रित वातावरणामध्ये वर्षभर लागवड शक्य.
कीड, रोगांपासून संरक्षण करणे शक्य.
चांगल्या प्रकारे फळधारणा.
काटेकोरपणे पाणी आणि खत व्यवस्थापन.
- यशवंत जगदाळे, ९६२३३८४२८७, ०२११२-२५५५२७ (विषय विशेषज्ञ -उद्यानविद्या, भाजीपाला गुणवत्ता केंद्र ,कृषी विज्ञान केंद्र,बारामती,जि.पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.