Team Agrowon
जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ वीस ते पंचवीस टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते.
या तंत्रज्ञानाने उपलब्ध जागेचा कार्यक्षम वापर करून भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. सर्व प्रकारचा परदेशी भाजीपाला, वांगी, सेलरी, बेसील, टोमॅटो, ढोबळी मिरची, लेट्युस, पालक, काकडी, ब्रोकोली, वाटाणा, बटाटा, वांगी, फळवर्गीय, सर्व प्रकारचा पालेवर्गीय भाजीपाला, बेरी, औषधी वनस्पती, तिखट मिरची इत्यादी रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.
जमिनीचे प्रमाण मर्यादित असलेल्या किंवा प्रदूषित माती किंवा मातीची उपलब्धता नाही अशा स्थितीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. जागेचा कार्यक्षम वापर करता येतो.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानासाठी वातावरणातील तापमान, आद्रता आणि प्रकाशाची तीव्रता यांचे पिकांच्या वेगवान वाढीसाठी आवश्यक प्रमाण ठेवले जाते. परिणामी वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते.
जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ वीस ते पंचवीस टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते.
पाण्यामध्ये पोषक खनिजे कृत्रिमरीत्या पिकांसाठी मिसळली जातात. मातीच्या तुलनेत या पाण्याचा पीएच अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो. या परिणाम असा होतो, की पिकाद्वारे पोषक अन्नद्रव्यांचे अधिक शोषण होऊन अधिक वाढ होते.
मातीतील पिकांच्या तुलनेमध्ये ५० टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
हायड्रोपोनिक्समध्ये तण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही किंवा मर्यादित राहतो. मशागत,आंतर मशागत, सिंचन, खुरपणी ही कामे करावी लागत नाही. परिणामी वेळ आणि मजुरांची बचत होते.
कमीत कमी जागेमध्ये वातावरण नियंत्रित पद्धतीचा वापर आणि भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे दुप्पट आणि वर्षभर उत्पादन घेता येते.