Fruits and Vegetables Agrowon
टेक्नोवन

Fruit and Vegetable Storage: फळे आणि भाज्या साठवण्याच्या प्रभावी पद्धती

Effective Storage Ideas: योग्य प्रकारे साठवण करून फळ आणि भाज्यांचे आयुष्यमान वाढवणे शक्य आहे. साठवणुकीमुळे ग्राहकाला दीर्घकाळापर्यंत फळे आणि भाज्या उपलब्ध करून देता येतात. बाजारात जेव्हा चांगला भाव मिळतो त्यावेळी शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणू शकतात.

Swarali Pawar

Fruit and Vegetable Storage: नुकत्याच आलेल्या नॅबकॉन्सच्या अहवालानुसार दरवर्षी भारतात ७३.६ लाख टन फळे आणि १.२ कोटी टन भाजीपाला वाया जातो. याची किंमत सरासरी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. योग्य साठवणीच्या सोयीअभावी फळे आणि भाज्या प्रचंड प्रमाणावर खराब होतात. मुळात फळे आणि भाजीपाला हंगामी आणि नाशवंत असतो. जास्त तापमानामुळे काढणीनंतर भाज्या आणि फळांमधील ५ ते १५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. परिणामी फळे आणि भाजीपाला सुकतात, ताजेपणा आणि आकर्षकपणा जातो; मुख्य म्हणजे वजनातही घट होते. नॅबकॉन्सच्या अहवालानुसार धोरणात्मक निर्णय, मूल्यवर्धन, योग्य प्रकारे साठवण आणि प्रक्रियेच्या माध्यमातून हे नुकसान कमी करणे शक्य असल्याचे सांगितले आहे.

साठवणुकीचे महत्त्व

हंगामात एकाचवेळी फळे आणि भाज्यांची आवक बाजारपेठेत होते, त्यामुळे भाव कोसळतात, शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत फळे आणि भाज्यांचे आयुष्यमान वाढवणे एक चांगला उपाय ठरतो. योग्य प्रकारे साठवण करून फळ आणि भाज्यांचे आयुष्यमान वाढवणे शक्य आहे. साठवणुकीमुळे ग्राहकाला दीर्घकाळापर्यंत फळे आणि भाज्या उपलब्ध करून देता येतात. बाजारात जेव्हा चांगला भाव मिळतो त्यावेळी शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणू शकतात.

साठवण कशी करावी?

काढणीनंतर फळे आणि भाज्यांमधील जैविक आणि रासायनिक क्रिया अखंड सुरू असते. परंतु कमी तापमानात या क्रिया मंदावतात. शिवाय फळे आणि भाज्या खराब होण्याचे दुसरे कारण म्हणजे बुरशी, किड, बॅक्टेरिया यांचा प्रादुर्भाव. यासाठी कमी तापमान, ठरावीक आर्दता आणि निर्जंतुकीकरण करुन साठवण करता येते. यासाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत. फळे व भाजीपाल्यांच्या साठवणुकीसाठी शेतकरी शीतगृह उभारू शकतात. शीतगृहात फळे आणि भाजीपाल्याची साठवण केल्याने त्यांचे आयुष्यमान वाढते हे शास्त्रीय प्रयोगातून सिद्धही झाले आहे. अगदी कमी साहित्यात घरच्या घरी शीतगृह उभारणे शक्य आहे.

शीतगृह म्हणजे नेमकी काय? कसे उभारावे?

  • अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, कमी खर्चिक शीतगृह भारतीय कृषी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

  • शीतगृहासाठी लागणाऱ्या वस्तू: विटा, नदी पात्रातील बारीक वाळू, बांबू, वाळलेले गवत, वाळा/नारळाच्या झावळ्या, सुतळी, वाया गेलेली पोती.

  • शीतगृहाची रचना: छोट्या हौदासारखी.

  • तळाशी विटांचा एक थर द्यावा. विटांचे थर देऊन भिंती रचाव्यात.

  • दोन भिंतीमध्ये ३ इंच मोकळी जागा सोडून, त्यात बारीक वाळू भरावी.

  • झाकण: बांबूच्या आधारावर पोत्यावर वाळा किंवा नारळाच्या झावळ्या पसरवून सुतळीने बांधावे.

  • हौद सावलीच्या जागी उभारावा व तिथे चांगल्या पाण्याचा सतत पुरवठा असावा.

  • उभारणीनंतर तळ, भिंती, वाळू व छत पाणी शिंपडून पूर्ण भिजवावे.

  • फळे व भाज्या ठेवण्यापूर्वी हौद पूर्ण भिजलेला असावा.

  • दररोज सकाळी व संध्याकाळी पाणी शिंपडावे.

  • ठिबक सिंचनाचा वापर पाणी देण्यासाठी करता येतो.

    (महात्मा कृषी विद्यापीठाच्या कृषीदर्शनीमध्ये ही पद्धत सुचवलेली आहे.)

शीतगृहाचा फायदा

शीतगृहात आंबा आणि संत्रीचे अनुक्रमे ८ ते २७ दिवसांनी आयुष्यमान वाढते. तसेच एप्रिल, मे महिन्यात कोथिंबीर, पुदिना आणि इतर पालेभाज्या बाहेरच्या तापमानात केवळ १ दिवस टिकतात पण शीतगृहात ठेवल्याने त्या ३ दिवस व्यवस्थित टिकतात. त्यामुळे त्या हिरव्यागार, ताज्या आणि टवटवीत राहतात. फळभाज्या सुद्धा १० ते १२ दिवसांपर्यंत ताज्या राहतात.

याव्यतिरिक्त फळे आणि भाजीपाला साठवणुकीसाठी वेगवेगळ्या प्रक्रिया उपलब्ध आहे. ज्यामध्ये फळे आणि भाजीपाला हवाबंद करून ठेवणे, फळांचा रस काढून तो साठवणे, फळांचे स्क्वॅश तयार करणे, जॅम आणि जेली तयार करणे, मुरांबे तयार करणे, फळांचे शीतपेये तयार करणे, लोणची तयार करणे असे फळांचे मूल्यवर्धन करणाऱ्या प्रक्रिया करणे ही फायदेशीर ठरते.

हवाबंद करुन ठेवणे

फळे आणि भाज्या हवाबंद करून ठेवण्यासाठी विशिष्ट डब्यांचा वापर करावा. शिवाय त्यांना हवाबंद करण्यासाठी सिलींग मशिनचा वापर करावा. पहिले फळे/भाज्या स्वच्छ कराव्यात. तलम कापडात बांधून ती १-२ मिनिटे उकळत्या पाण्यात बुडवावेत आणि लगेच थंड करावेत. नंतर साल काढून आणि फोडी करून निर्जंतुक केलेल्या डब्यात भरावे. फळांसाठी ४० ते ६० टक्के साखरेचा पाक तर भाज्यांसाठी ७.५ ते १० % मिठाचे द्रावण टाकून डब्यातील फोडी बुडून राहतील याची काळजी घ्यावी. या डब्यातील हवा काढण्यासाठी तो गरम करून लगेच सीलबंद करावा. डबा थंड झाल्यावर त्यांना थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे. हे डबे वर्षापेक्षाही अधिक काळ टिकून राहतात.

फळांचा रस साठवणे

फळांचा रस काढून तो हवाबंद डब्यात किंवा बाटल्यांमध्ये भरून साठवता येतात. रस टिकवण्यासाठी पाश्चरायझेशनच्या पद्धतीचा वापर करावा. बाटल्या ८५ अंश सेल्सियस तापमानास २५ ते ३० मिनीटे गरम करून पाश्चराईज कराव्यात. यासोबत सोडियम बेन्झोएट रासायनिक हे परिरक्षक(प्रिझव्हेटिव्ज्) रसाच्या टिकवण्यासाठी घालावे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Orchard Farming: अतिघन आंबा बागेतील फूल-फळ गळतीची कारणे

Guntur Chilli Prices: निर्यात मागणी वाढल्याने मिरचीला उच्चांकी दर, 'आंध्र'मधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Hydroponic Fodder: घरच्या घरी मातीशिवाय हिरव्या चाऱ्याचे उत्पादन कसे घ्यावे?

Dairy Business: दुग्ध व्यवसायातील अपयश पचवून प्रक्रिया उद्योगात खंबीर वाटचाल

Livestock Farmer: देशातील ३ कोटी पशुपालक दूध विकत नाहीत!

SCROLL FOR NEXT