Digital Crop Advisory Agrowon
टेक्नोवन

Phule Baliraja App : विद्यापीठाचे फुले बळीराजा ॲप देणार शेतकऱ्यांना सल्ला

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘फुले बळीराजा’ या डिजिटल कृषिसल्ला ॲप्लिकेशनचा लोकार्पण सोहळा पुणे येथे नुकताच पार पडला. हे ॲप शेतकऱ्यांना कृषी सल्ला देणार आहे.

टीम ॲग्रोवन

नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘फुले बळीराजा’ (Phule Baliraja App) या डिजिटल कृषिसल्ला ॲप्लिकेशनचा (Crop Advisory App) लोकार्पण सोहळा पुणे येथे नुकताच पार पडला. हे ॲप शेतकऱ्यांना कृषी सल्ला देणार आहे.

जर्मन सरकार बी. एम. झेड. व जी. आय. झेड., हैदराबाद येथील ‘नाबार्ड’चे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, राज्य सरकारचा कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे ‘फुले बळीराजा’ या डिजिटल कृषी सल्ला ॲप्लिकेशनचा लोकार्पण सोहळा पार झाला.

या वेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, नाबार्डचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक डॉ. जी. एस. रावत, हैदराबाद मॅनेजचे महासंचालक डॉ. भास्कर, प्रो-सॉईल प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, जी. आय. झेड. पुण्याचे विभागीय व्यवस्थापक रणजित जाधव व पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या कृषी अधिकारी भाग्यश्री पवार उपस्थित होते.

डॉ. मुकुंद शिंदे यांनी ‘फुले बळीराजा’ या डिजिटल कृषी सल्ला ॲप्लिकेशनच्या वापरासंबंधी सादरीकरण केले. सूत्रसंचालन रणजित जाधव यांनी केले. जितेंद्र यादव यांनी आभार मानले. फुले बळीराजा डिजिटल कृषी सल्ला ॲप शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल. हे ॲप शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामधील दरी कमी करून शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शन करणारे ठरेल. जमीन व हवामान यात सुसंगतता साधून पिकाचे नियोजन करण्यासाठी या ॲप्लिकेशनचा उपयोग होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

Parbhani Voting Percentage : परभणी जिल्ह्यात सरासरी ७१.४५ टक्के मतदान

Rabi Sowing : रब्बी पेरणीला वेग, हरभऱ्याची लागवड जोरात

Vote Turnout : मतदानाचा टक्का वाढला, आता लक्ष निकालाकडे

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

SCROLL FOR NEXT