Onion Pest Machine Agrowon
टेक्नोवन

Onion Processing Industry : कांदा पेस्ट निर्मितीसाठी लागणारी यंत्रे

कृष्णा काळे

कृष्णा काळे

Onion Pest Making Machine : कांदा जीवनसत्त्व ब आणि जीवनसत्त्व क तसेच लोह आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. स्वयंपाकाचा घटक तसेच प्रक्रिया उद्योगासाठी कांद्याला चांगली मागणी आहे.

कांद्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे शक्य होते. ताज्या कांद्याच्या सोबतच कांद्याची पेस्ट, निर्जलित फ्लेक्स,पावडर, तेल, व्हिनेगर, सॉस, लोणचे निर्मिती शक्य आहे.

कमीतकमी प्रक्रिया केलेले कांदे सोलून किंवा कापलेले कांदे ताजेपणा टिकवून ठेवतात. आहारात कांद्याचा वापर गोठवलेल्या कांद्याच्या रिंग्सद्वारे केला जातो.यासाठी कच्चे कांदे रिंगांमध्ये कापले जातात, वाळवले जातात आणि कमी तापमानात योग्य पॅकेजिंग सामग्रीमध्ये साठवले जातात. गोठवलेल्या कांद्याचे रिंग्ज १२ महिने टिकतात. ते थेट वापरासाठी किंवा सूप आणि ड्रेसिंगमध्ये वापरता येतात.

कांद्याची पेस्ट या उत्पादनाची टिकवणक्षमता चांगली आहे. निर्जलित कांदा फ्लेक्सपासून पावडर तयार करता येते. पिझ्झा आणि ब्रेड सारख्या भाजलेले पदार्थ तयार करण्यासाठी आणि ग्रील्ड चिकन मसाल्यासाठी देखील याचा वापर केला जातो. कांद्याचे तेल हे प्रक्रिया केलेल्या उत्पादनांच्या मसाला तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि काही खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या वापरला जाणारा संरक्षक म्हणून देखील वापरला जातो.

यंत्रांचा वापर

वॉशिंग यंत्र : कांद्यावर असलेले घटक स्वच्छ करण्यासाठी हे यंत्र वापरतात.

सोलणी यंत्र: टिकाऊ आणि गंजरोधक यंत्र वापरावे. कांदा सोलण्यासाठी या यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.

पेस्ट निर्मिती यंत्र : सोललेल्या कांद्याची चांगली पेस्ट तयार करण्यासाठी हे यंत्र वापरतात.

इलेक्ट्रिक हीटिंग जॅकेटेड केटल : कांद्याची पेस्ट गरम करण्यासाठी या यंत्राचा वापर करतात.

पाश्चरायझर : निर्जंतुकीकरण तापमान १ मिनिटांसाठी ६२ ते ८५ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवले जाते.

पॅकेजिंग यंत्र : कांदा पेस्ट भरण्यासाठी आणि सील करण्यासाठी पाऊच पॅकेजिंग यंत्र वापरतात.

पेस्ट तयार करण्यासाठी घटक

कच्चा कांदा

मीठ : २ ते ५ टक्के

सायट्रिक ॲसिड : ०.१ ते ०.२ टक्के

पेस्ट निर्मिती प्रक्रिया

चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याची निवड करावी. देठ आणि मुळे छाटावीत. यांत्रिक पीलिंगमध्ये कांद्याची साल काढून टाकली जाते. पेस्ट बनवण्यापूर्वी जेट स्प्रेने कांदा धुतला जातो.

धुतलेला कांदा प्रथम क्रशिंग यंत्रामध्ये टाकतात. पेस्ट तयार करण्यासाठी पल्पिंग यंत्राचा वापर केला जातो. बारीक अर्धी ओलसर प्युरी आणि पेस्टसाठी स्वयंचलित कांदा ग्राइंडिंग यंत्र वापरले जाते.

ताज्या कांद्याच्या पेस्टमध्ये सुमारे ८४ टक्के आर्द्रता असते. ओलावा कमी करण्यासाठी आणि कांद्याची पेस्ट मिसळण्यासाठी स्टीलच्या खुल्या भांड्यात / वाफेच्या किटलीमध्ये ११० अंश सेल्सिअस तापमानात गरम केली जाते. हँड रिफ्रॅक्टोमीटरवर ३२० ब्रिक्स मिळेपर्यंत लगदा केंद्रित केला जातो. २ टक्के मीठ चवीसाठी आणि ०.१ टक्के सायट्रिक ॲसिड टिकवण क्षमता वाढविण्यासाठी मिसळले जाते.

पेस्ट ८२ अंश सेल्सिअस किंवा किंचित कमी तापमानात गरम केली जाते. हीटिंग सिस्टमच्या प्रकारानुसार वेळ ३० सेकंद ते ३० मिनिटांपर्यंत असतो,

कांद्याची पेस्ट ७५ ते ८० अंशापेक्षा कमी नसलेल्या तापमानात रिसीव्हिंग टँकमधून फिलिंग यंत्रामध्ये जाते. कंटेनर पेस्टने भरले जातात. ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी लगेच सीलबंद केले जातात. कांद्याची पेस्ट डबा, बाटल्या, कॅन, पाऊच पॅक मध्ये भरली जाते.

स्टॅक बर्निंगमुळे चव कमी होण्यापासून रोखण्यासाठी कंटेनर थंड करणे आवश्यक आहे. थंड झाल्यावर योग्य जागी साठवण करावी.

कांद्यातील पोषक द्रव्ये

(प्रती १०० ग्रॅम)

ऊर्जा ४० किलो कॅलरी

प्रथिने १.१ ग्रॅम

तंतूमय घटक एकूण आहार १.७ ग्रॅम

कार्बोहायड्रेट ९.३४ ग्रॅम

एकूण लिपिड ०.१ ग्रॅम

साखर ४.२४ ग्रॅम

जीवनसत्व क (एकूण एस्कॉर्बिक आम्ल) ७.४ मिग्रॅ

कॅल्शिअम २३ मिग्रॅ

मॅग्नेशिअम १० मिग्रॅ

पोटॅशियम १४६ मिग्रॅ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT