Power Tiller Agrowon
टेक्नोवन

Kirloskar Power Tiller: किर्लोस्करने तयार केले 24 तास चालणारे पॉवर टिलर

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने (Kirloskar Oil Engines Limited) शेतकऱ्यांसाठी सेल्फ-स्टार्ट पॉवर टिलर (Self-Start Power Tiller) तयार केले आहे. या पॉवर टिलरमध्ये के-कुल इंजिनचा वापर करण्यात आला आहे.

Team Agrowon

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने (Kirloskar Oil Engines Limited) शेतकऱ्यांसाठी सेल्फ-स्टार्ट पॉवर टिलर (Self-Start Power Tiller) तयार केले आहे. या पॉवर टिलरमध्ये के-कुल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर १२ एचपी आणि १५ एचपीचे सेल्फ-स्टार्ट पॉवर टिलर २४ तास काम करू शकतात, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

"भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी पॉवर टिलरला सेल्फ-स्टार्टचा पर्याय देण्यात आलाय. त्याचबरोबर पॉवर टिलरमधील बैठक व्यवस्था तयार करताना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे." असे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समधील मेकॅनायझेशन विभागाचे व्यवसाय प्रमुख प्रमोद एकबोटे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून किर्लोस्कर फार्म मशिनरी शेतकऱ्यांना तांत्रिक आणि यांत्रिक सेवा पुरवत आहे. कंपनीने 'किर्लोस्कर शेत मशिनरी तुमच्या दारी' ही मोहीम राबवलीय. शेतीसाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वापरून बघता यावीत, हा त्यामागचा हेतु आहे. या मोहिमेत नव्याने तयार करण्यात आलेल्या सेल्फ स्टार्ट पॉवर टिलरचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा येथे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सांगली, सातारा जिल्ह्यातील ५०० हुन अधिक शेतकरी, पुढारी आणि विविध गावातील सरपंचांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT