Google Bard AI Agrowon
टेक्नोवन

Google Bard AI : 'चॅटजीपीटी'ला टक्कर देण्यासाठी गुगलकडून 'बार्ड'ची घोषणा!; बार्डची वैशिष्ट्ये काय?

ओपन एआयच्या चॅटजीपीटीपेक्षा गुगलचा बार्ड कसा वेगळा असेल याबाबत अजूनही गुगलने स्पष्ट असे काही सांगितले नाही. परंतु पिचाई यांनी बार्ड इंटरनेटवरील माहिती जलदगतीने शोधून देऊ शकतो.

Team Agrowon

Google Bard AI: ओपन एआय या कंपनीच्या 'चॅटजीपीटी'नंतर गुगलही चॅटबॉट बाजारात आणणार आहे.

अल्फाबेटचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sunder Pichai) यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉट निर्माण केला जात असून लवकरच वापरासाठी खुला करण्यात येईल अशी, माहिती सोमवारी (ता.६)  ब्लॉगद्वारे दिली आहे. 

'अल्फाबेट आयएन'सी या गुगलची मालकी असलेल्या कंपनीकडून हा चॅटबॉट विकसित करण्यात आला. या चॅटबॉटला 'बार्ड' असे नाव गुगलकडून देण्यात आले.

मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडून ओपनएआयशी चॅटबॉटसाठीच्या चर्चेनंतर गुगलकडूनही बार्डची घोषणा करण्यात आली.

त्यामुळे मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी गुगलने हा चॅटबॉट विकसित केल्याचेही मानले जाते.  

पिचाई यांनी ब्लॉगमध्ये लिहिले की, "आम्ही लवकरच एक असा चॅटबॉट सर्वांसाठी खुला करत आहोत, ज्यामध्ये अधिक कार्यक्षमपद्धतीने संवाद साधण्याची क्षमता असेल.

या चॅटबॉटला 'बार्ड' असे नाव देण्यात असून पुढील काही आठवड्यात तो प्रायोगिक तत्वावर खुला करत आहोत. जेणेकरून आम्हाला वापरकर्त्यांचा फिडबॅक जाणून घेतला येईल."

त्यांनी पुढे असेही लिहिले की, "गुगल कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काही विशेष वैशिष्ट्यांचा समावेश बार्डमध्ये करणार आहे. सध्या गुगल टाइप केलेल्या प्रश्नांची स्पष्टपणे उत्तरे देतो.  

मात्र बार्ड सर्च इंजिनच्या माध्यमातून गुंतागुंतीच्या गोष्टीही सोप्या करू शकतो. जसे की, तुम्ही बार्डच्या मदतीने गिटार किंवा पियानोसारखे वाद्यापैकी काय शिकणं सोपं आहे, याची उत्तरही मिळवू शकता."

ओपन एआयच्या चॅटजीपीटीपेक्षा गुगलचा बार्ड कसा वेगळा असेल याबाबत अजूनही गुगलने स्पष्ट असे काही सांगितले नाही. परंतु पिचाई यांनी बार्ड इंटरनेटवरील माहिती जलदगतीने शोधून देऊ शकतो.

चॅटजीपीटीकडची माहिती २०२१ पर्यंत मर्यादित आहे, चॅटजीपीटी २०२१ नंतरची माहिती देऊ शकत नाही.

बार्ड मात्र अधिक अपडेट असेल, असे संकेत सुंदर पिचाई यांनी ब्लॉगवर दिले आहेत.

'बार्ड' हे 'लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अॅप्लिकेशन' (LaMDA) वर आधारित आहे. त्यामध्ये अचूक प्रश्नांवर अधिक माहिती देण्याची क्षमता विकसित करण्यात आलेली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT