CSIR PRIMA ET11 Agrowon
टेक्नोवन

Eclectic Tractor : अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल

Indian Electric Tractor : सेंट्रल मॅकेनिकल इंजिनिरिंग रिसर्च इंस्टिट्यूट म्हणजेच सीएसआयआर प्रीमा ईटी ११ हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. ईटी ११ हा ट्रॅक्टर ७ ते ८ तास चार्ज केला तर चार तास शेतीची कामं करू शकतो.

Dhananjay Sanap

एफएमटीटीआयनं दिलं विद्यार्थ्यांना कृषी अवजारांचं प्रशिक्षण

देशातील कृषी अवजारांसाठी नामांकित साऊदर्न रिजन फार्मर्स मशिनिरी टेस्टिंग आणि ट्रेनिंग इंस्टिट्यूट म्हणजेच एफएमटीटीआयनं शेतकऱ्यांसाठी शेती अवजारांचं प्रशिक्षण आयोजित केलं. एफएमटीटीआयही दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करत असते. शेतकऱ्यांसोबतच अॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती अवजारांचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये स्वयंचलित अवजारांचा वापर आणि शेती अवजारांवरील संशोधन याचंही प्रशिक्षण दिलं जातं. अलीकडेच संस्थेनं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. 

ट्रॅक्टर खरेदीसाठी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज 

मागील तीन महिन्यात देशातील ट्रॅक्टर खरेदी आणि निर्यात वाढली आहे. देशातील कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळं कृषी ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या सणांचा काळ आहे. त्यामुळे शेतकरी शेती अवजारे खरेदीला प्राधान्य देतात. परंतु देशातील बहुतांश भागात मॉन्सूनच्या पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ट्रॅक्टर खरेदी करता यावं, यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ७ वर्ष मुदतीचं आणि ट्रॅक्टरच्या किमतीच्या ९० कर्ज बँकांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत चौकशी करू शकता.

कृषी यांत्रिकीकरणात भारत अजूनही मागेच

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर टंचाईमुळं समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचा अहवाल केंद्रीय संसदीय समितीनं गेल्या महिन्यात दिला आहे. या अहवालात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करायची असेल तर रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमतेला प्रोत्साहन देण्यात यावं, अशी शिफारस करण्यात आली आहे. सध्याच्या कृषी यांत्रिकीकरणाचा आढावाही या अहवालात घेण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारच्या स्माम योजनेचा व्याप्ती वाढवण्याच्या शिफारशी करण्यात आली आहे. भारतात कृषी यांत्रिकीकरणाचा केवळ ४७ टक्के वाटा आहे. तर चीनमध्ये ६० आणि ब्राझीलमध्ये ७५ टक्के शेती कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर केला जातो. पुढील २५ वर्षात शेतीकामांसाठी यांत्रिकीकरणाचा ७५ टक्क्यांपर्यंत वापर होऊ लागला तर उत्पादनात वाढ होईल, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.

आता रोबो करणार रोपांची लागवड

रोबोटिक्सच्या मदतीनं शेती क्षेत्रात बदल घडत आहेत. याचाच एक भाग म्हणजे रोपे लागवड करणारा रोबो!  रोपे लागवड करणारा रोबो सर्वसाधारणपणे पेरणी करणाऱ्या यंत्र मानवाप्रमाणेच असतो. पण रोपे लागवड करणाऱ्या यंत्रमानवामध्ये बीजन यंत्रणेऐवजी रोपे लागवड यंत्रणा असते. मात्र यात रोपे सुरक्षितपणे ठेवून, ती धरून योग्य प्रकारे हाताळण्याची व्यवस्था केलेली असते. रोपे लागवड यंत्रमानवही जी.पी.एस. सक्षम नकाशा किंवा त्याने स्वतःवरील सेन्सरच्या मदतीनं गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेतो. जमिनीचा प्रकार व ओलाव्याप्रमाणे योग्य जागेवर व योग्य खोलीवर रोपांची लागवड करतो.

देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक आहे. या शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठ्या ट्रॅक्टरचा उपयोग करताना अडचणी येतात. तसेच डिझेलवरील ट्रॅक्टरचा वापर पर्यावरण दूषित करतो. हीच अडचण ओळखून सेंट्रल मॅकेनिकल इंजिनिरिंग रिसर्च इंस्टिट्यूट म्हणजेच सीएसआयआर प्रीमा ईटी ११ हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. ईटी ११ हा ट्रॅक्टर ७ ते ८ तास चार्ज केला तर चार तास शेतीची कामं करू शकतो. तसेच फवारणीसारखी कामं सहा तास करतो. या ट्रॅक्टरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांही हा ट्रॅक्टर सहज चालवू शकतात. तसेच १.८ टन वजनाची ट्रॉली हा ट्रॅक्टर ओढू शकतो, असा दावा सीएसआयआरनं केला आहे. लवकरच कुशल या ब्रॅंडनेमनं हा ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सीएसआयआर सांगितलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT