Drone Subsidy Agrowon
टेक्नोवन

Drone Subsidy : कोरोमंडल इंटरनॅशनलकडून महिलांसाठी २०० ड्रोन

केंद्र सरकारने 'नमो ड्रोन दीदी' योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला. याच योजनेंतर्गत कोरोमंडल इंटरनॅशनल या संस्थेनं कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील महिला बचत गटांना २०० ड्रोन वितरित केले.

Dhananjay Sanap

केंद्र सरकारने 'नमो ड्रोन दीदी' योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला. याच योजनेंतर्गत कोरोमंडल इंटरनॅशनल या संस्थेनं कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील महिला बचत गटांना २०० ड्रोन वितरित केले. कोरोमंडल इंटरनॅशनल ही संस्था मुरुगप्पा ग्रुपची असून शेती निविष्ठांच्या निर्मितीसह अन्य क्षेत्रात कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ मध्ये नमो ड्रोन दिदी योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील १५ हजार महिलांना ड्रोनसाठी अनुदानसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असा केंद्र सरकारचा दावा आहे.

कोरोमंडल इंटरनॅशनल अलीकडेच रंगारेड्डी जिल्ह्यातील माणिक्यम्मागुडा आणि आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिला बचत गटांना २०० ड्रोन वितरित केले. "आम्ही माहिलांना शेती कामांसाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिलं आहे." असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. कोरोमंडल इंटरनॅशनलनं एक दिवसात ३० एकर क्षेत्र फवारणी करणारे ड्रोन तयार केल्याचा दावाही केला आहे.

ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील फवारणी सोपी व्हावी यासाठी विविध खाजगी कंपनी पुढाकार घेत आहेत. अलीकडेच भात, तंबाखू, मिरची, कापूस, ऊस आणि डाळी या विविध पिकांवर एकाच ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्याचं प्रात्यक्षिके कोरोमंडलनं आयोजित केले होते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर ठरत आहे, असंही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.११) भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या कार्यक्रमात एक हजार ड्रोन वितरित करण्याची घोषणा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT