Digital Policy Agrowon
टेक्नोवन

Digital Policy : डिजिटल प्लॅटफार्मवरून होणार तंत्रज्ञानाचा प्रसार

केंद्र सरकारकडून डिजिटल धोरणाला प्रोत्साहन दिले जात असताना, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने देखील डिजिटल माध्यमांचा उपयोग तंत्रज्ञान प्रसारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः केंद्र सरकारकडून डिजिटल धोरणाला (Digital Policy) प्रोत्साहन दिले जात असताना, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (Cotton Research Center) देखील डिजिटल माध्यमांचा उपयोग तंत्रज्ञान (Agriculture Technology) प्रसारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत विविध डिजिटल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यावर येत्या काळात भर देण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती संस्थेच्या सूत्रांनी दिली.

देशभरातील संशोधन संस्थांद्वारे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, अशी सातत्याने ओरड होते. त्यामुळेच अनेक संस्थांना शेतकरी पांढरा हत्ती असेही संबोधतात. दुसरीकडे विस्तार यंत्रणा नसल्याने आणि हे काम कृषी विभागाकडे असल्याचा दावा संशोधन संस्थांकडून होत आला आहे. अशातच आता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने मात्र एक पाऊल पुढे टाकत विस्तारासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामध्ये टेक्‍स्ट एसएमएस, व्हॉट्‍सॲप, यू-ट्यूब, इन्स्टाग्राम, ॲप यांसारख्या साधनांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना पिकावर कीड-रोग आल्यास त्याचे नियंत्रण कसे करावे या विषयीदेखील ऑनलाइन माध्यमातूनच मार्गदर्शन करण्याचेही या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांनी कीड-रोग किंवा त्यांच्या इतर प्रश्‍नांसंदर्भात व्हिडिओ काढून तो शेअर केल्यास अशा प्रकरणातही संस्थेचे तंत्र शेतकऱ्यांना माहिती देतील.

शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचावी याकरिता डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्याचे प्रस्तावित आहे. प्रयोगशीलतेच्या बळावर उत्पादकता वाढ नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथाही या माध्यमांद्वारे इतर शेतकऱ्यांसमोर पोहोचविण्यात येतील. त्याआधारे शेतीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार- प्रसार होईल.

- डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT