तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!
तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन! 
टेक्नोवन

तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!

वृत्तसेवा

जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता करण्यासोबत, वन्यजीवांचा रहिवास, हवेची शुद्धता, कर्बवायूंचे शोषण अशा अनेक अंगाने अत्यंत महत्त्वाची ठरते. येत्या भविष्यामध्ये लोकसंख्या वाढत जात असताना शेतीखालील क्षेत्र मर्यादित राहणार आहे. अशावेळी पर्माकल्चर सर्कल्स किंवा रिंग गार्डन ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते. सध्या केवळ संकल्पनात्मक पातळीवर असलेल्या या तंत्रामध्ये खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यामध्ये रूपांतर, सौर ऊर्जेचा पुरेपूर वापर, अन्न उत्पादन यांचा विचार करण्यात आला आहे. विशेषतः कॅलिफोर्नियासारख्या दुष्काळग्रस्त किनाऱ्यावरील भागांमध्ये त्याचा वापर अधिक फायदेशीर ठरू शकते. या रिंग गार्डनमध्ये फिरती संरचना असणार आहे. पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्यातून प्रतिवर्ष १६ दशलक्ष गॅलन (६०.५ दशलक्ष लिटर) शुद्ध पाणी, ४० हजार पौंड (१८१४३ किलो ) पिकांचे उत्पादन, ११ हजार पौंड (४९८९ किलो ) चारा जनावरांसाठी उपलब्ध होईल. सध्या दुष्काळी स्थितीमुळे कॅलिफोर्नियाच्या सुमारे ८० टक्के भागाला पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. या दोन्ही घटकांवर मात करण्यासाठी ॲलेक्झांन्ड्रू प्रेडोन्यू यांनी सौर ऊर्जेवर आधारित फिरता निक्षारीकरण प्रकल्प आरेखित केला आहे. यामध्ये सॅण्टा मोनिका या शहरासाठी केवळ पिण्यासाठीच नव्हे, तर शेतीसाठीही पाण्याची उपलब्धता होणार आहे. यामध्ये मातीरहित स्थितीमध्ये पिकांची विशेषतः शेवाळांची शेती करण्यात येईल. असे आहे वैशिष्ट्यपूर्ण आरेखन

  • रिंग गार्डनमध्ये फिरता निक्षारीकरण प्रकल्प, एअरोपोनिक्स तंत्राने शेती आणि शेवाळ बायोरिॲक्टर यांचा समावेश असेल.
  • खालील समुद्रातून खारे पाणी उचलले जाईल. त्यावर सौर ऊर्जेच्या साह्याने चालवलेल्या दाब पंपाच्या साह्याने खारे पाणी ऑस्मॅटिक दाबापेक्षा अधिक दाबाने विशिष्ट आकाराच्या गाळणीमधून (सेमी पर्मेबल मेम्ब्रेन) पुढे पाठवले जाते. यामुळे पाण्यातील लहान मोठे प्राणी, मासे पुढील निक्षारीकरण प्रक्रियेमध्ये येत नाहीत.
  • सौर ऊर्जेवरील निक्षारीकरण प्रक्रियेतून उपलब्ध झालेले पाणी या रिंग गार्डनमधील सुमारे ६० टक्के रोपांना पुरू शकेल. ३० टक्के पाणी पिण्यासाठी शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला पुरवले जाईल. उर्वरित १० टक्के पाणी हे तुलनेने अधिक क्षारयुक्त असल्याने सागरी जिवांच्या वाढीसाठी धोकादायक ठरू शकते. याचा वापर बायोरिॲक्टरमध्ये स्परुलिना शेवाळाच्या वाढीसाठी करता येईल.
  • उत्तम, पर्यावरणपूरक आरेखन २०१६ मध्ये रिंग गार्डन या आरेखनाला उत्तम आरेखनाचा पुरस्कार मिळाला होता. या आरेखनामध्ये कॅलिफोर्नियाच्या क्षितिजावर चक्राच्या मध्यातून सूर्य प्रकाशित होईल. या क्षेत्राला भेट देण्याची एक योजना राबवण्याचा विचार असून, त्यातून लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरूकता निर्माण करता येईल. यातून पर्यटनाचाही विकास होईल. येथे उत्पादित होणाऱ्या भाज्यांची विक्री नावीन्यपूर्ण पद्धतीने करणे शक्य होईल.

    पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये एअरोपोनिक्स किंवा आर्द्रतायुक्त वातावरणामुळे पिकांची वाढ करणे या तंत्रासाठी ९८ टक्के कमी पाणी लागते. या तंत्रामध्ये ३० टक्के अधिक उत्पादन मिळते. या रिंगगार्डनमध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाणी, सूर्यप्रकाश, पोषक घटक आणि कार्बनडाय ऑक्साइड आपल्या जागेवरच उपलब्ध होणार आहे. कोणतीही वाहतूक करावी लागणार नाही. १००० वर्गमीटर अशा शेतीतून साध्या सुमारे २६ हजार वर्गमीटर जमिनीइतके भाज्यांचे उत्पादन मिळू शकते. प्रतिवर्ष सुमारे ३४० दशलक्ष गॅलन गोडे पाणी उपलब्ध होऊ शकेल. रिंग गार्डनची उभारणी केल्यानंतर ९ दशलक्ष गॅलन पाणी प्रतिवर्ष आवश्यक असेल. मात्र, त्यातून उपलब्ध होणारे उर्वरित ३३१ दशलक्ष गॅलन पाणी कॅलिफोर्निया येथील २३०० घरांना पुरवता येईल. - ॲलेक्झांन्ड्रू प्रेडोन्यू

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

    Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

    Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

    Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

    Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

    SCROLL FOR NEXT