MPTC Implement 
टेक्नोवन

किफायतशीर बैलचलित अवजारे

प्रा. एस. एन. सोलंकी, ए. ए. वाघमारे, प्रा. डी. डी. टेकाळे

बैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार वेगवेगळ्या तबकड्या असून त्या सहज बदलता येतात. बियाणे व खत योग्य प्रकारे पेरता येते. दोन फणातील अंतर गरजेनुसार बदलता येते. बैलचलित तीन पासेच्या कोळप्याने एका मजुराच्या साह्याने आपण तीन ओळीतील आंतरमशागत आणि खत देण्याचे काम एकाचवेळी करू शकतो.

बैलचलित बहुविध अवजारे यंत्र खरीपमध्ये बऱ्याचवेळा पेरणी, रासणी आणि तणनाशक फवारणीचे काम एकामागे एक करताना पावसामुळे बऱ्याच अडचणी येतात, त्यामुळे खंड पडतो. त्यादृष्टीने बैलचलित बहुविध अवजारे ओढणी यंत्र फायदेशीर ठरते.

वैशिष्ट्ये 

  • हे बैलचलित बहूपीक टोकण यंत्र आहे. 
  • यामध्ये पिकानुसार वेगवेगळ्या तबकड्या असून त्या सहज बदलता येतात. बियाणे व खत योग्य प्रकारे पेरता येते. दोन फणातील अंतर गरजेनुसार बदलता येते. 
  • एकाच वेळेस खत व बी पेरणी, रासणी व तणनाशक फवारणी करता येते. 
  •     आंतरमशागतीच्या वेळी पिकातील अंतरानुसार पास बसवून कोळपणी व फवारणी करता येते. 
  • सौर ऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र वापरून फवारणी करता येते. 
  •  सदरील सर्व यंत्रे, एकाच फ्रेमवर आवश्यकतेनुसार बसविता येतात. 
  • यंत्रामुळे वेळ व खर्चाची २५ ते ५० टक्के बचत होते. 
  • शेताच्याकडेला वळताना बी व खत बंद करता येते. हे यंत्र एका मजुराच्या साह्याने चालविता येते. 
  • फायदे 

  • पारंपरिक पेरणीच्या पद्धतीपेक्षा जास्त कार्यक्षमतेमुळे पेरणी वेळेवर पूर्ण होते. 
  • २५ ते ३० टक्के वेळ आणि ६ ते २० टक्के बियाणे आणि ५५ ते ६५ टक्के मजुरीची बचत होते. 
  • पेरणी खर्चात ३० ते ५० टक्के बचत होते. पीक उत्पादनात ५ ते २० टक्के वाढ होते. 
  •  यंत्राच्या साह्याने आंतरपीक पेरणी शक्य होते.  
  • कार्यक्षमताः पाच एकर प्रति दिवस. 
  • किंमत : ४५,००० रुपये
  • गादीवाफ्यावरील हळद व आले काढणी यंत्र   पारंपरिक पद्धतीमध्ये गादी वाफ्यावरील हळद व आले काढणीचे काम बळीराम  नांगर किंवा मजुराच्या साह्याने खोदकाम करून केले जाते. त्यामुळे काढणीचा खर्च व  वेळ वाढतो.  हळद, आल्याचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन गादी वाफ्यावरील हळद व आले काढणी यंत्र विकसित केले  आहे. 

  • यंत्राची लांबी ९० सेंमी पासून १५० सेंमीपर्यंत कमी-जास्त करता येते. 
  • रुंदी ३५ सेंमी व उंची ५० सेंमी असून त्यास दोन चाके बसविली आहेत. 
  • गादीच्या उंचीनुसार कामाची खोली कमी-जास्त करता येते. या यंत्रावर दोन ३० सेंमी रुंदीचे त्रिकोणी आकाराचे फण बसविलेले आहेत. दोन ओळीतील हळद, आल्याच्या अंतरानुसार फणातील अंतर कमी-जास्त करता येते. 
  •  यंत्र चालवण्यासाठी एका मजुराची आवश्यकता आहे. 
  • एका दिवसात १ हेक्टर क्षेत्रावरील हळद आणि आल्याची काढणी करता येते. 
  • यंत्रामुळे २५ ते ३० टक्के वेळ व खर्चाची बचत होते. 
  • यंत्राची किंमत ः १०,००० रुपये
  • बैलचलित तीन पासेचे कोळपे  पारंपरिक पद्धतीमध्ये कोळपणी करताना  दोन/तीन कोळपी एकाच जू वर दोन/तीन मजुरांच्या साह्याने आंतर मशागत केली जाते. ज्वारी,  बाजरी, मका इ. पिकासाठी खत पेरणीकरिता  वेगळे मजूर लागतात. त्यास जास्त वेळ आणि खर्चही वाढतो. हे लक्षात घेऊन बैलचलित तीन पासेचे खत कोळपे विकसित केले  आहे.

    वैशिष्ट्ये

  • हे खत कोळपे लोखंडी साहित्यापासून बनवले आहे.
  • एक मजुराच्या साह्याने आपण तीन ओळीतील आंतरमशागत आणि खत देण्याचे काम एकाचवेळी करू शकतो.
  • अवजाराची लांबी १७० सेंमी आणि उंची ३० ते ४५ सेंमी करता येते. त्यावर २२.५ सेंमी व ३० सेंमी रुंदीच्या तीन पास बसविता येतात. त्यामुळे खत पेरणी आणि आंतरमशागतीचा वेळ वाचतो.
  • अवजाराच्या साह्याने कोळपणी करण्याकरिता ५० ते ५२ किलो इतकी ओढशक्ती लागते. 
  •  तीन पासेच्या खत कोळप्याचे साह्याने 
  • एका दिवसात २.५ ते ३ एकर क्षेत्राची 
  • कोळपणी व खत देण्याचे काम आपण करू शकतो. 
  • किंमत ः ३,५०० रुपये
  • - ए. ए. वाघमारे, ८२७५९४७५३१  -  प्रा. डी. डी. टेकाळे, ९८५०१४११२१ (अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प,  कृषी क्षेत्रात पशु शक्तीचा योग्य वापर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

    Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

    Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

    Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

    Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

    SCROLL FOR NEXT