Modern machines for spraying, dusting
Modern machines for spraying, dusting 
टेक्नोवन

Agriculture Mechanization : फवारणी, धुरळणीसाठी आधुनिक यंत्रे

डॉ. तुळशीदास बास्टेवाड,

Farming Machines : फवारणीसाठी लागणाऱ्या वेळ, श्रम व खर्च यामध्ये बचत करण्यासाठी सुधारीत यंत्रांचा शेतीकामांमध्ये वापर करणे गरजेचे आहे. या यंत्रामुळे विविध कामे करणे अत्यंत सोपस्कर होते.  ट्रॅक्टरचलित एअर बूम फवारणी यंत्र

  1.   कापूस, सोयाबीन, वाटाणा इ  पिकावरील कीटकनाशक फवारणीसाठी तसेच तणनाशक फवारणीसाठी उपयुक्त.

  1.   फवारणीसाठी लागणाऱ्या वेळ, श्रम व खर्च यामध्ये बचत होते. 

ट्रॅक्टरचलित एअरो ब्लास्ट  फळबाग फवारणी यंत्र

  1.   ३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या पीटीओच्या साह्याने चालवता येते. 

  1.   फळबागेत रसायनांच्या फवारणीसाठी उपयुक्त. 

  1.   टाकी क्षमता ४०० लिटर.

ट्रॅक्टरचलित टायकून स्प्रेयर 

  1.   ३५ ते ५० अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.  

  1.   पीटीओच्या साह्याने ऊर्जा दिली जाते.

  1.   टाकी क्षमता - ४०० लिटर.

  1.   फवारणी क्षमता- ३६ लिटर प्रति मिनीट (९५० फेरे प्रति मिनीट -आरपीएम आणि दाब जास्तीत जास्त ४०० पीएसआय.)

  1.   मोठ्या झाडाच्या फळबागेत फवारणीसाठी उपयुक्त.

ट्रॅक्टरचलित स्लरी डिस्पेंसर 

  1.   या यंत्राद्वारे शेणखत स्लरी, जिवामृत, जिवाणू खते पातळ स्वरूपामध्ये देता येतात.

  1.   टाकीच्या आत स्लरी ढवळण्यासाठी शाफ्ट दिला आहे. 

  1.   वेळेची, श्रमाची व पैशाची बचत होते. 

  1.   क्षमता- २०० लिटर.

ड्रोन स्प्रेअर

  1.   विद्यापीठामध्ये या यंत्राची प्रक्षेत्रीय चाचणी घेण्यात आलेली आहे. 

  1.   पिकावर ठरावीक अंतरावर योग्य प्रमाणात अचूक फवारणी करता येते. 

  1.   फवारणीशी माणसाचा संपर्क येत नाही. त्यामुळे विषारी रसायनांचे आरोग्यावरील दुष्परिणाम टाळणे शक्य होते.

  1.   कमी वेळेत जास्त क्षेत्राची फवारणी करता येते. 

  1.   ज्या ठिकाणी मनुष्य किंवा अन्य यंत्रे जाणे किंवा चालवणे शक्य होत नाही, अशा ठिकाणीही फवारणीसाठी त्यांचा वापर करता येतो. उदा. डोंगराळ भाग, पाण्याखालील क्षेत्र इ.

ट्रॅक्टरचलित मॅन्युअर स्प्रेडर 

  1.   ४० ते ४५ अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.  

  1.   या यंत्रामुळे खत झाडांच्या बुंध्यापाशी टाकता येते.

  1.   ३ ते ९ फुटांपर्यंत खत समायोजित करता येते.  

  1.   द्राक्षे, डाळिंब, संत्री व  मोसंबी इ. फळबागांसाठी उपयुक्त. 

  1.   वेळेची, श्रमाची व पैशाची बचत होते. 

- डॉ. तुळशीदास बास्टेवाड,   ९४२३३४२९४१ (प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT