Devendra Fadnavis agrowon
शासन निर्णय

Energy Projects : राज्यात ५ हजार २२० मेगावॅट ऊर्जा निर्मितीबाबत करार

Devendra Fadnavis : राज्यात ५ हजार २२० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये करार झाला

Team Agrowon

Maharashtra Govt signed Agreement : महाराष्ट्र राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी. अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.

सामंजस्य करारामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ४०० एकर परिसरात १०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील. त्यावर ४७२ कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी (पुणे) येथे २५.६ मेगावॅट क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी५१८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मेगावॅटचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणार असून त्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने उर्जा सामंजस्य कराराच्या माध्यमातून आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. २०३० पर्यंत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के वीज ही अपारंपरिक स्वरूपाची असेल असे उद्दिष्ट केंद्राने निश्चित केले आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांना गती देण्यात यावेत. .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: फार्मर आयडीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना फटका

Adulteration Issue: दूध, अन्नभेसळ टाळण्यासाठी देशी गोपालन कार्यक्रमांची गरज

Agri Diploma Jobs: कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत न्याय देणार; कृषिमंत्री कोकाटे

Banana Harvest: खानदेशात आगाप कांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात

India China Relation: भारत-चीनमध्ये हवा खुला संवाद : एस. जयशंकर

SCROLL FOR NEXT