Well Subsidy
Well Subsidy Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Scheme Fund : बाराशे आदिवासी शेतकऱ्यांना विहिरींची अद्याप प्रतीक्षाच

Team Agrowon

Amravati News : शासनाकडून आदिवासी कल्याणाच्या गप्पा होत असताना त्यांच्यासाठी असलेल्या कृषी योजनांना निधीच उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून तब्बल १२०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले आहेत.

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट परिसरात आदिवासी शेतकऱ्यांव्दारे पारंपरिक पिकांच्या उत्पादकता वाढीचे प्रयत्न होत आहे. त्याकरिता सिंचन वाढीसाठी हे शेतकरी सरसावले आहेत. याच आदिवासी शेतकऱ्यांसाठी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना राबविली जाते.

पाइप, कृषिपंप, सौरपंप, शेतीला लागणाऱ्या साहित्याचा देखील योजनेअंतर्गंत समावेश आहे. दुर्गम मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. मात्र निधीची उपलब्धता वेळेवर होत नसल्याने शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

शासनाने पारदर्शी प्रक्रियेचा हवाला देत मॅन्युअल प्रस्तावाऐवजी ऑनलाइन प्रक्रियेला प्रोत्साहन दिले. त्यामध्ये अर्ज करण्यापासून ते अनुदान वितरण या साऱ्या बाबी पोर्टलच्या माध्यमातून होतात.

शेतकरी निवडीकरिता लॉटरीदेखील ऑनलाइन पद्धतीने काढली जाते. मात्र ऑनलाइन अर्जसुद्धा दुर्लक्षित होत आहेत.

धारणी व चिखलदरा तालुक्‍यातील आदिवासी शेतकऱ्यांचे २०२० ते २०२२ या वर्षात १२०० अर्ज पडून आहे. ही प्रक्रिया रखडत ठेवून प्रशासनाकडून लाभार्थी निवडीसाठी नव्याने अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक रोष आहे.

महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत चार लाख, तर मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषिक्रांती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या योजनेतील विहिरीसाठी अडीच लाख अनुदान मिळते. उर्वरित रक्‍कम लाभार्थ्यांना खर्ची घालावी लागत असल्याने अनुदान रक्‍कमेत वाढ करावी, अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT