Animal Care Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत २२ हजार पशुधनांवर उपचार

Livestock Treatment : या शिबारांतर्गत २३९ शिबिरांमध्ये २२ हजार पशुधनांची तपासणी लसीकरण आणि औषधोपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

Team Agrowon

Pune News : पावसाळी हवामानात पशुधनाला होणारे आजार होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी पशुधनांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व ग्रामंपचायतींमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत एक दिवसीय शिबिराचे शुक्रवारी (ता.७) आयोजन करण्यात आले होते.

या शिबारांतर्गत २३९ शिबिरांमध्ये २२ हजार पशुधनांची तपासणी लसीकरण आणि औषधोपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्ह्यात १३ तालुक्यांमध्ये २३९ ठिकाणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये किरकोळ उपचार (५ हजार ५९), वंधत्व (२ हजार ९३२), गर्भतपासणी (३ हजार ३५१), खच्चीकरण (५६९), लसीकरण (२२ हजार २९०) जंतनाशक गोळ्या (२१ हजार ५९५), शस्त्रक्रिया (६०३) पशुधनांवर उपचार करण्यात आले.

पावसाळ्यामध्ये अतिसार आणि इतर प्रामुख्याने आजार होत असतात. हे आजार होऊ नये आणि पशुधनाची दूध देण्याची क्षमता कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी पावसाळी औषधोपचार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

यासाठी दैनंदिन तपासणी देखील सुरू असून, १ हजार ३८५ पैकी ७०२ ग्रामपंचातींमध्ये एक दिवसीय शिबिर घेण्यात येणार आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

Agricultural Pumps: कृषी पंपांना मिळेना अखंडित वीजपुरवठा

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागाची कारवाई

Threshing Season: रायगड जिल्ह्यात ‘मळणी’चा उत्सव सुरू

Agriculture Bhavan: अमरावतीच्या कृषी भवनला हवा इच्छाशक्‍तीचा टेकू 

SCROLL FOR NEXT