Takari Irrigation Scheme
Takari Irrigation Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’चा मुख्य कालवा वाहू लागला

टीम ॲग्रोवन

वांगी, जि. सांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या (Takari Irrigation Scheme) लाभक्षेत्रात पाण्याची मागणी (Water Demand) वाढल्याने यंदाचे पहिले आवर्तन बुधवारपासून (ता. ७) सुरू झाले. वेळेत पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

ताकारी लाभक्षेत्रात वाढलेल्या सिंचनक्षेत्रासाठी जमिनीतून सातत्याने पाणीउपसा होत असल्याने काही भागांत दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. पाणी पातळी खालावण्यापूर्वीच ताकारी योजना सुरू करून शेतीपिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत होती.

त्यानुसार पाणी आवर्तन सुरू केल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली. गतवर्षीपेक्षा यंदा मॉन्सूनचा प्रचंड पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते; मात्र नियमित बारमाही, तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी भरमसाट पाणीउपसा होत असल्याने महिन्यापूर्वीच ओढे आटले आहेत.

सर्वच भागांतील विहिरी सांगळ्यावर आल्या असून, बोअरवेलचे पाणीही कमी झाले आहे. काही दिवसांतच पाण्याचा खडखडाट होऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. त्यामुळे ‘ताकारी’चे आवर्तन सुरू करण्याचे नियोजन झाले.

कोयना जलाशयातून मंगळवारी (ता. ६) सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीतील पातळी साटपेवाडी बंधाऱ्यात वाढू लागताच टप्पा १ वरील तीन पंप सुरू करून सागरेश्वर येथील टप्पा २ वरील संतुलन हौदात पाणी साठविण्यात आले. या हौदात मुबलक पाणीसाठा होताच टप्पा २ वरील तीन पंप सुरू करून मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.

नदीतील पातळीचा अंदाज घेत आणखी पंप सुरू करून चांगल्या दाबाने पाणी वितरण केले जाणार आहे. लाभक्षेत्राच्या जमिनीतील पातळीचा अंदाज घेऊन तत्काळ पाणी सोडल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या पाण्याचा उपयोग कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यांतील बहुतांश शेतीला, तसेच बऱ्याच गावांच्या पिण्याच्या पाणी योजनांना होतो.

ताकारी योजनेचे पाणी प्रथमतः मुख्य कालव्याच्या सुरुवातीच्या भागाला दिले जाणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील संपूर्ण कालव्याला पाणी दिले जाईल. सर्व शेतकऱ्यांना भरपूर व पुरेसे पाणी पोहोचविल्याशिवाय योजना बंद होणार नाही. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे.

- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT