शिवार फेरी Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

शेतीपूरक व्यवसाय करताना विविध योजनांचा लाभ घ्यावा

शिवारफेरी व शेतकऱ्यांशी बैठकीद्वारे संवाद कार्यक्रम

टीम ॲग्रोवन

मोरगाव, ता. बारामती ः ‘‘शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताना शेतकऱ्यांनी कृषी विभागांच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, त्यातून शेतकरी कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचाविण्यास निश्चित मदत होईल,’’ असा विश्वास मोरगाव विभागाचे कृषी सहायक प्रसाद तावरे यांनी व्यक्त केला.

तरडोली (ता. बारामती) येथे बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांच्या सूचनेनुसार शिवारफेरी व शेतकऱ्यांशी बैठकीद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना तावरे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या भापकर होत्या. रोजगार हमी-फळबाग लागवड, नाडेफ, गांडूळ खत प्रकल्प, पुष्प लागवडीसाठी पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थींची निवड या वेळी करण्यात आली.

महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगर, ठिबक सिंचन, भाजीपाला रोपवाटिका आदी कृषी योजनांची माहिती या वेळी प्रसाद तावरे यांनी दिली. तसेच मृदा व जलसंधारण कामाची मागणीची नोंद या वेळी घेण्यात आली. या मागणीचा विचार करून मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात तरडोली गावात निश्चित काम केले जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीचे सदस्य हणमंत भापकर, चंद्रकांत भापकर, दिनेश भोसले, किसन भापकर, राजेंद्र सर्जे, संगीता साळवे व शेतकरी उपस्थित होते.

योग्य माहिती घेऊन अचूक प्रस्ताव दिल्यास कृषी विभागाच्या योजनांचा लाभ निश्चित मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ शेतीच्या विकासासाठी घेऊन मुलांना भविष्यकाळात शेतशिवारातच उद्योजकतेचा पायंडा पाडून द्यावा.

-विद्या भापकर, सरपंच

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT