PM Kisan Yojna News Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : अद्याप ८३ हजार पात्र कुटुंबे ई-केवायसीपासून दूर

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सध्या चार लाख २५ हजार ८४३ शेतकरी वार्षीक सहा हजार रुपये निधीसाठी पात्र ठरले आहेत.

Team Agrowon

PM Kisan Scheme Update नांदेड : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत (PM Kisan) नांदेड जिल्ह्यात सध्या चार लाख २५ हजार ८४३ शेतकरी वार्षीक सहा हजार रुपये निधीसाठी पात्र ठरले आहेत.

या सन्मान निधीचे हप्ते सुरळित सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलवर ई-केवायसी (PM Kisan E-KYC) करण्याचे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले होते. परंतु जिल्ह्यात ८३ हजार ६८२ शेतकरी कुटुंबे अद्याप ई-केवायसीपासून दूर आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पाच लाख १८ हजार ६६७ पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लाभार्थी कुटुंबांची माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत सन्मान निधीअंतर्गत बारा हप्त्यांत दोन हजार रुपयांनुसार प्रतिवर्ष सहा हजार रुपये रक्कम मिळाली आहे.

पुढील हप्ते नियमित चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.

यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या सेतु सुविधा किंवा सीएससी केंद्रावर जाऊन काम करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

आजपर्यंत तीन लाख ४६ हजार १६१ कुंटुंबांनी ई-केवायसी पूर्ण केले. परंतु अद्याप ८३ हजार ६८२ शेतकरी कुटुंबांनी ई-केवायसी केले नसल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या जिल्ह्याती सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने अनेकवेळा केले आहे. परंतु अद्याप काही शेतकरी ई-केवायसी करण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय ई-केवायसी अपूर्ण असणारी शेतकरी कुटुंबे

अर्धापूर १,९२७, भोकर ४,५९०, बिलोली ४,३३१, देगलूर ६,५८१, धर्माबाद २,८६२, हदगाव ७,२८३, हिमायतनगर ३,९४५, कंधार ८,७२८, किनवट ९,०६१, लोहा ७,७१०, माहूर ३,६१५, मुदखेड २,१४५, मुखेड ७,६६७, नायगाव ५.९१९, नांदेड ४,१००, उमरी ३,२३८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

Maharashtra Corrupt Ministers: कलंकित, भ्रष्ट मंत्री, आमदारांची हकालपट्टी करा

Achalpur APMC Scam: अचलपूर समितीत कोट्यवधीचा बांधकाम घोटाळा

Cow Based Farming: देशात गौ आधारित कृषी पद्धतीला मिळावी चालना

Livestock Registration: ‘कृषी’ दर्जानंतर पशुपालकांच्या नोंदणीला मिळेना प्रतिसाद

SCROLL FOR NEXT