Agriculture Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Scheme : ‘कृषी’च्या १२ योजनांसाठी ८३ लाख रुपयांची तरतूद

कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने २०२२-२३ या वर्षाकरिता ८३ लाखांची तरतूद केली आहे.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः कृषी विभागाच्या (Agriculture Department) विविध योजनांसाठी (Agriculture Scheme) जिल्हा परिषद कृषी विभागाने २०२२-२३ या वर्षाकरिता ८३ लाखांची तरतूद केली आहे. या निधीतून बारा योजना राबविण्यात येणार आहेत. साधारणपणे १ हजार ३६७ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ (Benefit Of Agriculture Scheme) दिला जाणार आहे.

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. येत्या आर्थिक वर्षात योजना राबविण्यासाठी कृषी विभागाने ८३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

या निधीतून शेतकऱ्यांना कीटकनाशके, पॉवर स्प्रे, ग्रास कटर, ताडपत्री, प्लॅस्टिक क्रेट, नारळ शिडी, डिझेल इंजिन, विद्युत पंप, पीव्हीसी पाइप यासह अन्य काही योजनांसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

कोरोनाबाधीत मृत व्यक्तीच्या वारसदारांना या योजनांमध्ये प्राधान्य देण्याचे जिल्हा परिषदेचे धोरण आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी २८ सप्टेंबरपूर्वी कृषी विभागाकडे प्रस्ताव देण्यात यावेत. प्राप्त प्रस्तावांना २ ऑक्टोबरला मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुरी देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी दिली.

योजना निधीची तरतूद

कीटकनाशके २ लाख

पोर्टेबल पॉवर स्प्रे १० लाख

नॅपसॅक स्पेअर २ लाख

ग्रास कटर ४२ लाख

प्लॅस्टिक ताडपत्री ५ लाख

प्लॅस्टिक क्रेट ३ लाख

नारळ शिडी २ लाख

डिझेल इंजिन ४ लाख

विद्युत पंप ८ लाख

पीव्हीसी पाइप ३ लाख

वणवा २ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana: निकषांत अपात्र लाडक्या बहिणींचा थांबणार लाभ

Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे

Irrigation Project: ‘चणकापूर’मधून डावा कालवा प्रस्तावित करा

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

SCROLL FOR NEXT