Rural Development Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Development Planning : बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजनचा आराखडा करणार

बुलडाणा जिल्हा नियोजन व विकास योजनेतून जिल्ह्याला ३७० कोटी रुपयांचा निधी येत्या वर्षात मिळणार आहे. मात्र यावर्षी शासनाने या निधीमधून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये अमुलाग्र बदल केला आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा जिल्हा नियोजन व विकास योजनेतून जिल्ह्याला ३७० कोटी रुपयांचा निधी येत्या वर्षात मिळणार आहे. मात्र यावर्षी शासनाने या निधीमधून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये अमुलाग्र बदल केला आहे.

प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या मदतीने विभागांना थेट कामे सुचवावी लागणार आहेत. यातून जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजनचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात येत्या वर्षाच्या आराखड्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सांख्यिकी उपसंचालक जयंत अढाव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी यावर्षी नियोजन विभागास विविध विभागांनी सादर करावयाच्या प्रस्तावांबाबत माहिती दिली. यापूर्वी केवळ गाभा, बिगर गाभा अशा प्रकारे माहिती सादर करण्यात येत होती. आता यात बदल करण्यात आला आहे.

जिल्ह्याची बलस्थाने, मागासपणा आणि धोके लक्षात घेऊन अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीची कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजनमधून तयार करण्यात येणाऱ्या आराखड्यात आता थेट कामे सूचवावी लागणार आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत.

जिल्ह्याची अवलंबिता कृषी क्षेत्रावर अधिक आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जादा लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राचा विकास करताना कृषीपूरक व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट लक्षात घेऊन कामे हाती घेण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्यावर आवकेचा दबाव, मुळा दर टिकून, टोमॅटो दबावतच, बटाट्याला मागणीचा आधार तर पपई दर स्थिर

Paddy Crop Damage : पावसाचा भात पिकाला फटका

Banana Market : केळीची महिना-दीड महिना उधारीने विक्रीची वेळ

Agrowon Diwali Article: शेतीत रमलेला डॉक्टर

E-Peek Pahani : पीक पेरा नोंद होत नसल्याने अडचण

SCROLL FOR NEXT