Solar Project Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Solar Project : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सौर प्रकल्पांसाठी आता संधी

Agriculture Scheme : शेतीकामासाठी आवश्‍‍यक असणारी वीज शेतकऱ्यांना दिवसा मिळावी, यासाठी मुख्‍यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे.

Team Agrowon

Satara News : शेतीकामासाठी आवश्‍‍यक असणारी वीज शेतकऱ्यांना दिवसा मिळावी, यासाठी मुख्‍यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार महावितरणच्‍या जिल्ह्यातील ३३ उपकेंद्रांलगतच्या ५ किलोमीटर परिघातील जागांचा पर्याय निवडण्‍यात येत आहे.

यासाठीची तांत्रिक चाचपणी, प्रक्रिया सुरू आहे. यात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना तीन वर्षांत १५ लाखांचे अनुदान मिळणार आहे. शेती, घरगुती व व्‍यावसायिक ग्राहकांना अखंडित व मागणीइतकी वीजपुरवठा करण्‍यावर मर्यादा पडत आहेत. हे टाळण्‍यासाठी राज्‍य सरकारने सौर ऊर्जानिर्मितीवर भर दिला आहे.

या ऊर्जा निर्मितीसाठी गाव, वीज वितरणच्‍या उपकेंद्रांलगतच्या पडीक जागा व गायरान जमिनींचा शोध घेण्‍यात येत आहे. अनेक ग्रामपंचायतींच्‍या अखत्‍यारित गायरानाचे ठे भूखंड असून, त्‍यावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्‍प उभारता येणे शक्‍य आहे. या जागा ग्रामपंचायतींनी त्‍यासाठी द्याव्‍यात, यासाठी महसूल विभाग प्रयत्‍न करत आहेत.

ग्रामपंचायतींना प्रतिवर्ष पाच लाख याप्रमाणे तीन वर्षांत १५ लाखांचे अनुदान देण्‍यात येणार आहे. जिल्ह्यात महावितरणची ३३ उपकेंद्रे आहेत. पाच किलोमीटर परिघातील जागा उपलब्‍ध झाल्‍यास त्‍यावर १९८ मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकणार आहे. ही ऊर्जा त्‍या उपकेंद्राच्‍या फिडरला जोडून त्‍याद्वारे भागात दिवसा व अखंडित वीजपुरवठा होऊ शकणार आहे.

एकरी ५० हजार भाडे...

गायरानसोबत शेतकरीही त्‍यांच्‍या मालकीची पडीक किमान तीन एकर जमीन या प्रकल्‍पासाठी भाडेपट्ट्यावर देऊ शकणार आहेत. ही जमीन महावितरण उपकेंद्रापासून ५ किलोमीटर परिघात असल्यास आणि प्रकल्‍पासाठी शेतकऱ्याने ती दिल्‍यास त्‍याला एकरी ५० हजार रुपये भाडे मिळणार आहे. यात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्‍यासाठीचे अर्ज महावितरणकडे केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Pumps Power Connections: महावितरणकडून १३ हजारावर कृषीपंपांना वीजजोडण्या

Sugarcane Smut Disease: उसावरील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण कसे करावे?

Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित

Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?

Mohol-Tandulwadi Highway Project: मोहोळ-तांदूळवाडी महामार्गावरून सोलापुरात ‘श्रेयवाद’

SCROLL FOR NEXT