Micro Irrigation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Micro Irrigation Scheme Subsidy : सूक्ष्म सिंचन योजनेचे अनुदान तातडीने देण्याची मनसेची मागणी

बुलडाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक तसेच तुषार संच घेतले आहेत.

Team Agrowon

Buldana Irrigation Scheme News : बुलडाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक तसेच तुषार संच घेतले आहेत. या शेतकऱ्यांना अनुदानाची काही रक्कम अद्यापही मिळालेली नसल्याने तातडीने ती वितरित केली जावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे, की शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार संचासाठी अर्ज केले होते. त्यांना संमती मिळाल्यानंतर संच विकत घेतले. यासाठी काहींना अनुदानाचे काही हप्ते मिळाले. काही शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाच एकही हप्ता मिळाला नाही.

या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावेत. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले, ज्ञानेश्वर कांडेलकर, राजेश काळे, अजय बेलोकार, प्रसिद्धीप्रमुख योगेश सपकाळ, शहराध्यक्ष सागर जगदाळे, निकेतन वाघमारे यांच्यासह इतर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India's GDP Growth: जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत आर्थिक वाढ ८.२ टक्क्यांवर; सलग दोन तिमाहीमध्ये वाढ

Traditional Storage: फळे आणि भाजीपाला साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती

Water Scarcity: मंडळपाडा सुविधांपासून वंचित

Sugarcane Trash: जमीन सुपीकतेसाठी पाचट व्यवस्थापन

Bidri Sugar Factory: 'बिद्री'कडून प्रतिटन ३,६१४ रुपये दराने ऊसबिले जमा, साखर उतारा १०.८५ टक्के

SCROLL FOR NEXT